हिंदुस्तान स्टील वर्क्स कन्स्ट्रक्शन लिमिटेड (HSCL)च्या वित्तीय पुनर्रचनेला केंद्रीय मंत्रिमंडळाने संमती दिली. नॅशनल बिल्डींग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन लिमिटेड (एनबीसीसी) कडून एचएससीएल ताब्यात घ्यायलाही मंजूरी देण्यात आली.
1502.2 कोटी रुपयांच्या गैर योजना ऋण, ऋण आणि त्यावरचे थकित व्याज आणि थकित हमी शुल्काचे समभाग आणि इक्विटी भांडवलात रुपांतर करण्यात येईल. 1585 कोटी रुपयांचा 31.3.2015 पर्यंतचा तोटा समायोजित करण्यात येईल. संचयित तोटा नाहीसा केल्यानंतर एचएससीएलचे इक्विटी आणि पेड अप भांडवल 34.3 कोटी होणार आहे. एनबीसीसी, एचएससीएल मधे 35.7 कोटी भांडवल घालणार आहे. यामुळे एचएससीएल, एनबीसीसीची सहाय्यक कंपनी होणार आहे. एनबीसीसीकडे 51 टक्के भागभांडवल राहिल. एचएससीएल मधला सरकारचा हिस्सा 49 टक्क्यापर्यंत कमी करण्यात येणार आहे.
N. Chitale / B. Gokhale