Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

एनएटीआरआयपी प्रकल्पाच्या सुधारित खर्चाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी


नॅशनल ऑटोमोटिव्ह टेस्टिंग अँड रिसर्च अँड डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्‍ट अर्थात एनएटीआरआयपीच्या सुधारित प्रकल्प खर्चाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. ऑटोमोटिव्ह उद्योगाच्या संरक्षण आणि संशोधनात्मक गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीने यामुळे मदत होणार आहे. रस्ता सुरक्षिततेसाठी जागतिक सर्वोत्तम प्रथांचे पालन तसेच पर्यावरण रक्षणासाठी एनएटीआरआयपी प्रकल्प गरजेचा आहे. भारतीय वाहन सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून जागतिक तोडीची व्हावी तसेच मध्यम आणि लघु उद्योगांच्या विकासालाही चालना मिळावी यादृष्टीने हा प्रकल्प उपयुक्त ठरणार आहे.

MD/ST/NC/AK