Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

एचएमटी मर्यादितला अर्थसंकल्पीय सहाय्य देण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने आज एचएमटी मर्यादितला अर्थसंकल्पीय सहाय्य देण्यास मंजुरी दिली. थकीत वेतन, मजुरी आणि कर्मचाऱ्यांची इतर प्रलंबित देणी चुकती करण्यासाठी हे सहाय्य दिले जाणार आहे. एचएमटी ट्रॅक्टर शाखा बंद करण्याच्या प्रस्तावाला आज केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.

या मंजुरीनुसार एचएमटी लिमिटेडला 718.72 कोटी रुपये प्रदान केले जाणार आहेत.

एचएमटीच्या बंगळुरू आणि कोची येथे असणाऱ्या लहान जमिनी सार्वजनिक वापरासाठी हस्तांतरीत करण्याला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.

B.Gokhale/M.Pange/P.Kor