केंद्रीय अवजड उद्योग विभागाने दिलेल्या खालील प्रस्तावांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. बंगळूरु आणि टुमकूर येथील एचएमटी वॉचेस लि. यां कंपनीच्या 208.35 एकर जमिनीचे भारतीय अंतराळ संशोधन संघटनेला(इस्रो) 1194.21 कोटी रुपये आणि देय असलेले कर व शुल्क यांच्या मोबदल्यात हस्तांतरण; एचएमटी लि. च्या बंगळूरु येथील एक एकर जमिनीचे गॅस ऑथॉरिटी ऑफ इंडिया(गेल) या कंपनीला 34.30 कोटी रुपये व इतर देय कर आणि शुल्काच्या मोबदल्यात हस्तांतरण या जमिनीच्या विक्रीतून येणारी रक्कम, कंपनीकडून या व्यवहारावर लागू होणारे कर आणि इतर शुल्क चुकते केल्यावर, त्यांची कर्जे व आगाऊ रक्कम चुकती करण्यासाठी सरकारच्या खात्यात जमा केली जाईल.
एचएमटी वॉचेस लि. ही कंपनी सर्वसामान्य भारतीय नागरिकांसाठी घड्याळे बनवण्यामध्ये अग्रणी होती आणि एकेकाळी भारताची समय प्रहरी म्हणून ओळखली जात होती. मात्र, वाढत्या तोट्यामुळे ही कंपनी बंद करावी लागली आणि स्पर्धात्मक आर्थिक वातावरणामध्ये या कंपनीचे पुनरुज्जीवन होऊ शकणार नाही हे निश्चित झाल्यावर जानेवारी 2016 मध्ये ही कंपनी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. या कंपनीच्या जमिनीचा आता लोकहिताच्या दृष्टीने अधिक चांगल्या प्रकारे वापर केला जाणार आहे.
N.Sapre/S.Patil/Anagha