Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

उस्ताद रशीद खान यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला


नवी दिल्ली 09 जानेवारी 2024

भारतीय शास्त्रीय संगीत विश्वातील उत्तुंग व्यक्तिमत्त्व असलेल्या उस्ताद रशीद खान यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शोक व्यक्त केला आहे.

एक्स मंचावर लिहिलेल्या संदेशात पंतप्रधान म्हणतात;

“भारतीय शास्त्रीय संगीताच्या जगातील एक महान व्यक्तिमत्त्व असलेल्या उस्ताद रशीद खान यांच्या निधनाने मी व्यथित झालो आहे. त्यांची अतुलनीय प्रतिभा आणि संगीत कलेप्रती समर्पण यांनी आपल्या सांस्कृतिक विश्वाला समृध्द केले आणि अनेक पिढ्यांना प्रेरित केले. त्यांच्या निधनामुळे कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांचे कुटुंबीय, शिष्यगण आणि असंख्य चाहत्यांच्या दुःखात सहभागी आहे”.  

Pained by the demise of Ustad Rashid Khan Ji, a legendary figure in the world of Indian classical music. His unparalleled talent and dedication to music enriched our cultural world and inspired generations. His passing leaves a void that will be hard to fill. My heartfelt… pic.twitter.com/u8qvcbCSQ6

— Narendra Modi (@narendramodi) January 9, 2024

***

Sonal T/SC/CY

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai