रोममध्ये 30 आणि 31 ऑक्टोबर 2021 या दोन दिवसांत होत असलेल्या जी-20 राष्ट्रांच्या नेत्यांच्या परिषदेच्या सोबतच इटलीचे पंतप्रधान महामहीम मारिओ द्राघी आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्विपक्षीय बैठक घेतली.
भारत आणि इटली या देशांदरम्यान 2020 ते 2024 या कालावधीसाठीच्या कृती आराखड्याचा 6 नोव्हेंबर 2020 पासून केलेल्या स्वीकारापासून आतापर्यंत या दोन्ही देशांदरम्यान द्विपक्षीय नातेसंबंधांमध्ये लक्षणीय प्रगती झाल्याचे मत दोन्ही नेत्यांनी यावेळी व्यक्त केले. जी-20 देशांची परिषद आणि ग्लासगो येथे होत असलेली सीओपी26 ही परिषद यांमध्ये मध्यवर्ती स्थान असलेल्या हवामान बदलाच्या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी आपल्या विद्यमान उर्जा स्वरूपाचे स्वच्छ उर्जेत स्थित्यंतर करण्यासह कृती योजनेत आखून दिलेल्या सर्व धोरणात्मक विषयांमध्ये सहकार्य आणखी बळकट करण्याचा निश्चिय दोन्ही देशांनी व्यक्त केला.
या दोन्ही नेत्यांनी भारत- युरोपियन महासंघ नेत्यांमध्ये पोर्टो येथे 8 मे 2021 रोजी झालेल्या बैठकीत दोन्ही देशांच्या नेत्यांनी हवामान बदलाच्या समस्येतील परस्परावलंबी आव्हाने, जैवविविधतेचे नुकसान आणि प्रदूषण यांच्याबाबत उपाय शोधून काढण्याची निकड व्यक्त केली होती याचे स्मरण केले. तसेच समुद्रकिनाऱ्यावरील पवन ऊर्जेसारख्या नाविन्यपूर्ण नवीकरणीय तंत्रज्ञानांच्या वापरासह इतर नविकरणीय उर्जा स्त्रोतांच्या वापराबाबत सहकार्य आणखी मजबूत करण्याबाबत तसेच हरित हायड्रोजन वापर तंत्रज्ञानाचा अधिक वापर, उर्जा कार्यक्षमतेला प्रोत्साहन, स्मार्ट ग्रीडचे विकसन आणि साठवण तंत्रज्ञान, वीज पुरवठा बाजाराचे आधुनिकीकरण याबाबत सहकार्य अधिक दृढ करण्याला या बैठकीत सहमती दर्शवली होती.
त्याचबरोबर, स्वच्छ ऊर्जेकडे परिणामकारक पद्धतीने स्थित्यंतर करून त्यातून रोजगार निर्मिती, स्थूल राष्ट्रीय उत्पादनात वाढ, उर्जेच्या बाबतीतील गरिबी दूर करण्यासोबतच, सार्वत्रिक उर्जेची उपलब्धता पुन्हा सुरु करणे या साठीचे अत्यंत महत्त्वाचे धोरण असलेल्या किफायतशीर उर्जा समावेशकतेसाठी पुनर्नविकरणीय उर्जेच्या वापराचे प्रमाण आपापल्या देशांमध्ये वाढवीत नेणे अत्यंत महत्त्वाचे आहे यावर बैठकीत दोन्ही बाजूंचे एकमत झाले.
या दृष्टीकोनातून, 2030 सालापर्यंत 450 गिगावॅट नविकरणीय उर्जा वापरण्याच्या भारताच्या निश्चयाची तसेच आंतरराष्ट्रीय सौर आघाडीला इटलीने दिलेली मान्यता आणि सक्रीय पाठिंब्याचे दोन्ही पंतप्रधानांनी कौतुक केले आणि उर्जा स्थित्यंतराच्या बाबतीत द्विपक्षीय धोरणात्मक भागीदारी सुरु करण्याला मंजुरी दिली.
अशी भागीदारी इटलीचे पर्यावरणीय स्थित्यंतर आणि भारत सरकारच्या नवीन तसेच पुनर्नविकरणीय उर्जा मंत्रालय, वीज मंत्रालय आणि पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय याच्या दरम्यान असलेल्या पुनर्नविकरणीय उर्जा आणि शाश्वत विकास यासंदर्भातील सहकार्याला नवी प्रेरणा देण्यासह विद्यमान द्विपक्षीय यंत्रणेला बळकटी देऊ शकेल.
उर्जा स्थित्यंतरा संदर्भातील भागीदारीला प्रोत्साहन देण्यासाठी भारत आणि इटली हे देश खालील उपक्रम हाती घेणार आहेत:
N.Chitale/S.Chitnis/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com