Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

उदयपूर इथे विविध महामार्ग प्रकल्पाचे पंतप्रधानांनी केले उदघाटन आणि भूमिपूजन, प्रताप गौरव केंद्रालाही भेट

उदयपूर इथे विविध महामार्ग प्रकल्पाचे पंतप्रधानांनी केले उदघाटन आणि भूमिपूजन, प्रताप गौरव केंद्रालाही भेट

उदयपूर इथे विविध महामार्ग प्रकल्पाचे पंतप्रधानांनी केले उदघाटन आणि भूमिपूजन, प्रताप गौरव केंद्रालाही भेट


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राजस्थानमधल्या उदयपूर इथे अनेक महत्वाच्या प्रकल्पाचे भूमिपूजन आणि उद्धघाटनही केले.
मेवाडच्या वीरभूमीत आल्याने आपण प्रभावित झाल्याचे पंतप्रधानांनी या कार्यक्रमात बोलताना सांगितले.

नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या जनतेच्या या संकट समयी केंद्र सरकार पाठीशी असून या आव्हानांवर जनता मात करेल आणि आणखी जोमाने आगेकूच करेल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.

15000 कोटी रुपयांपेक्षा जास्त प्रकल्पांचे आज एकाच कार्यक्रमात उदघाटन अथवा भूमिपूजन करण्यात आले.

देशाच्या प्रगतीसाठी पायाभूत प्रकल्प महत्वाचे आहेत असे सांगून पायाभूत प्रकल्पाच्या विशेषतः दळणवळण प्रकल्पातला विलंब देशाला परवडणारा नाही असे पंतप्रधान म्हणाले.रस्ते प्रकल्पासारखे प्रकल्प जनतेच्या जीवनात नवी ऊर्जा आणतात असे पंतप्रधान म्हणाले.

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी सुरु केलेल्या सुवर्ण चतुष्कोण प्रकल्पाचा उल्लेख करत त्यामुळे शेतकरी वर्ग बाजारपेठेशी जोडला गेल्याचे पंतप्रधान म्हणाले.

उत्तम दळणवळण सुविधांद्वारे राजस्थानच्या पर्यटनाला लाभ होईल आणि त्यामुळे पर्यटनालाही चालना मिळेल असे ते म्हणाले.

ग्रामीण भागातल्या कुटुंबाना एलपीजी जोडणी देणाऱ्या उजवला यॉर्कनेच उल्लेख त्यांनी केलावस्तू आणि सेवा करामुळे, .राज्यांच्या सीमांवर ताटकळत थांबण्याचा वाहनांचा वेळ वाचल्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा लाभ झाल्याचे ते म्हणाले.पंतप्रधानांनी प्रताप केंद्रालाही भेट दिली.

पी. आई.बी./ बी.गोखले/ एन चितळे