Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

उत्तर प्रदेशातील हाथरस येथील रस्ते अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांकडून  शोक व्यक्त


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील हाथरस येथे  रस्ते अपघातात झालेल्या  जीवितहानीबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्या प्रवाशांना  लवकरात लवकर बरे वाटावे, अशा सदिच्छाही पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केली  आहे.

अपघातामध्‍ये मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांच्या जवळच्या नातेवाइकांना  ‘पंतप्रधान राष्‍ट्रीय मदत निधीतून दोन लाख रूपये तर, जखमींवर तातडीने उपचारासाठी 50,000 रूपये मदत जाहीर केली  आहे. 

पंतप्रधान कार्यालयाने ‘एक्स’ या समाज माध्‍यमावर  पोस्ट केले;

‘’उत्‍तर प्रदेशातील हाथरस येथे झालेला रस्‍ते अपघात अत्‍यंत वेदनादायक आहे. या अपघातामध्‍ये ज्यांनी आपल्या नातेवाइकांना गमावले, त्यांच्‍या दुःखात सहभागी आहे.  त्यांना  अशा कठिण प्रसंगातून  सावरण्‍याची शक्‍ती ईश्‍वराने द्यावी. त्याचबरोबर या अपघातामध्‍ये जखमी झालेल्‍यांना लवकरात लवकर बरे वाटावे, अशी मी प्रार्थना करतो. राज्य सरकारच्या देखरेखीखाली स्‍थानिक प्रशासन अपघातग्रस्‍तांना सर्वतोपरी मदत करीत आहे : PM @narendramodi”

पंतप्रधानांनी या अपघातामध्‍ये मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांच्या जवळच्या नातेवाइकांना  ‘पंतप्रधान  राष्‍ट्रीय मदत निधी’ तून दोन लाख रूपये तर, जखमींवर तातडीने उपचार करण्‍यासाठी 50,000 रूपये मदत  जाहीर केली आहे. 

***

S.Kane/S.Bedekar/P.Kor

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com