Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

उत्तर प्रदेशातील फतेहपूर येथील रस्ते अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त


नवी दिल्ली, 16 मे 2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यातल्या रस्ते अपघातातील जीवित हानीबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. मोदी यांनी  पीडितांसाठी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी (PMNRF) मधून सानुग्रह अनुदान जाहीर केले  आहे.

पंतप्रधान कार्यालयाने ट्विट केले;

उत्तर प्रदेशमधील फतेहपूर इथे झालेला रस्ते अपघात अत्यंत दुःखद आहे. या अपघातात ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांच्या दुःखात मी सहभागी आहे.  त्याचबरोबर जखमी झालेल्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी मी प्रार्थना करतो.  राज्य सरकारच्या देखरेखीखाली स्थानिक प्रशासन पीडितांना सर्वतोपरी मदत पुरवत आहे : पंतप्रधान मोदी

पंतप्रधान @narendramodi यांनी फतेहपूर येथील दुर्घटनेत प्राण गमावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबांना  2 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपये देण्यात येतील.

 

S.Bedekar/S.Kane/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai