Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

उत्तर प्रदेशातील कन्नौज येथे बस अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त; पंतप्रधान राष्‍ट्रीय मदत निधीतून सानुग्रह अनुदान जाहीर


 

नवी दिल्ली, 6 डिसेंबर 2024

 

पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातील कन्नौज येथे बस अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला.पंतप्रधान नरेंद्र  मोदी यांनी अपघातामध्‍ये मृत्यूमुखी पडलेल्या प्रवाशाच्या जवळच्या नातेवाइकाला प्रत्‍येकी  दोन लाख  रुपये तर जखमींना उपचारासाठी प्रत्येकी 50,000 रूपये   सानुग्रह अनुदान  पंतप्रधान राष्‍ट्रीय मदत निधीतून जाहीर केले.  

‘एक्स’या समाज माध्‍यमावर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले:

“उत्तर प्रदेशातील कन्नौज येथे झालेल्या बस दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीमुळे दु:ख झाले आहे.ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांच्याबद्दल शोक व्यक्त करतो.जखमींना  लवकर बरे वाटावे.स्थानिक प्रशासन अपघातग्रस्‍तांना मदत करत आहे.

या अपघातातील मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांच्या जवळच्या नातेवाइकाला पंतप्रधान राष्‍ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपये दिले जातील. तर जखमींना उपचारासाठी प्रत्येकी 50,000 रूपये सानुग्रह अनुदान दिले जाईल:PM@narendramodi”

S.Kakade/S.Bedekar/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai