झारखंड आणि बिहारमधल्या उत्तर कोयल धरण प्रकल्पाचे उर्वरित काम पूर्ण करण्याच्या अपेक्षित 1622.27 कोटी रुपये खर्चाच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी मिळाली आहे.या प्रकल्पाचे काम पुन्हा सुरु झाल्यापासून तीन वर्षासाठीच्या खर्चाचा हा अंदाज आहे.
धरणामुळे पाण्याखाली जाणारा भाग कमी राहावा आणि बेतला राष्ट्रीय उद्यान त्याचबरोबर पलामू व्याघ्र अभयारण्य वाचवण्यासाठी, धरणाचा जल स्तर आधी निश्चित केल्यापेक्षा मर्यादित ठेवण्यालाही मंत्रिमंडळाने मान्यता दिली.हे धरण, झारखंड राज्याच्या पलामू आणि गढवा या अतिशय मागास आदिवासी भागात येते.1972 पासून या धरणाचे काम सुरु झाले होते मात्र 1993 मधे बिहारच्या वन खात्याने ते थांबवले तेव्हापासून हे काम ठप्प होते.
NS/NC