उत्तराखंडमध्ये देवस्थळ येथील 3.6 मीटर लांबीची ऑप्टीकल दुर्बिण, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बेल्जियमचे पंतप्रधान चार्ल्स मिशेल यांनी आज संयुक्तपणे रिमोट पध्दतीने सक्रीय केली.
दोन्ही देशांमधील नजीकचे सहकार्य, विशेषत: भारताच्या ए आर आय ई एस अर्थात Aryabhatta Research Institute of Observational Sciences आणि बेल्जियमच्या ए एम ओ एस अर्थात Advanced Mechanical and Optical System या संस्थांच्या सहकार्याच्या परिणामस्वरुप हिमालयात उत्तराखंडमध्ये ही दुर्बिण उभारण्यात आली आहे.
जागतिक दर्जाची ही अत्याधुनिक दुर्बिण महत्वाच्या वैज्ञानिक प्रयोगांमध्ये निरीक्षणासाठी प्राधान्याने वापरली जाईल.
हिमालयाच्या कुशीत उभारलेली, सर्व दिशांना वळू शकणारी ही ऑप्टीकल दुर्बिण या ठिकाणी यशस्वीरित्या उभारल्याबद्दल पंतप्रधानांनी यावेळी दोन्ही देशांच्या वैज्ञानिकांचे अभिनंदन केले. शासकीय प्रयत्नांबरोबरच ए आर आय ई एस ही स्वायत्त संघटना आणि ए एम ओ एस या खाजगी कंपनीच्या एकत्रित प्रयत्नांतून ही दुर्बिण उभारली आहे, असे त्यांनी आवर्जून नमूद केले. ब्रसेल्सहून 6500 किलोमीटर दूर असणारी दुर्बिणही रिमोटने तांत्रिकदृष्ट्या सक्रीय करता येते, हे पाहिल्यानंतर प्रयत्नांचा समन्वय साधता आला की काहीच अशक्य नसते हे पटते, असे ते म्हणाले. याबाबतीत आकाश ही मर्यादाही तोकडी आहे, असे गौरवोद्गार पंतप्रधानांनी काढले.
M.Pange /I.Jhala / M. Desai
PM Michel & I activated India's largest optical telescope, an example of what India-Belgium partnership can achieve. https://t.co/j9hciAsp2v
— Narendra Modi (@narendramodi) March 30, 2016