Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

ई-नौका शुभारंभ

ई-नौका शुभारंभ

ई-नौका शुभारंभ

ई-नौका शुभारंभ

ई-नौका शुभारंभ


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सायंकाळी आपल्या लोकसभा मतदारसंघातील “अस्सी घाट” येथे पर्यावरण स्नेही “ई-नौके” चा शुभारंभ केला.

अस्सी घाट येथील समारंभात भाषणाला व्यासपीठावर येण्यापूर्वी पंतप्रधानांनी नाविकांशी संवाद साधला. आणि ई-नौकेतून गंगा नदीमध्ये फेरफटकाही मारला.

ई नौकेमुळे जलाशयामध्ये प्रदूषणाचे प्रमाण कमी होणार असून जलपर्यटकांनाही अधिक चांगला आनंद घेता येणार आहे. या इंधनावर तुलनेने कमी खर्च होणार आहे, त्यामुळे नाविकांनी झालेली बचत पुढच्या पिढीच्या कल्याणासाठी वापरावी, असे आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केले.

देशातल्या गरीब जनतेचे दारिद्र्य दूर करण्यासाठी आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यावर सरकार भर देत असल्याचं पंतप्रधानांनी सांगितले. नौका चालवून देशांतील लक्षावधी लोक गुजराण करीत आहेत. त्यांच्या सन्मानार्थ संपूर्ण देशी बनावटीच्या दिशादर्शक उपग्रहाला “नाविक” नाव देण्यात आल्याचं पंतप्रधानांनी यावेळी सांगितले.

S.Bedekar/ BG