“ईद-उल-फित्तर”निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. विविध राज्य सरकारांच्या प्रमुखांशीही पंतप्रधानांनी संपर्क साधून ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
“ईद-उल-फित्तरनिमित्त माझ्या सदिच्छा. समाजात एकोपा आणि शांततेची भावना कायम राहावी, यासाठी आजच्या विशेष दिनी शुभेच्छा व्यक्त करतो.” ईदनिमित्त किंग सलमान अबूधाबीचे प्रिन्स, कतारचे प्रमुख यांनाही पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या.
राष्ट्राध्यक्ष रौहानी, अध्यक्ष घनी पंतप्रधान नवाझ शरीफ, पंतप्रधान शेख हसिना, आणि राष्ट्राध्यक्ष यामीन यांनाही ईदच्या शुभेच्छा पंतप्रधानांनी दिल्या आहेत.
S.Bedkar/B.Gokhale
My greetings and best wishes on Eid-ul-Fitr. May this special day deepen the spirit of harmony and peace in society.
— Narendra Modi (@narendramodi) July 6, 2016