Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

इन्स्टिटयूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट ऑफ इंडिया आणि सौदी ऑर्गनायझेशन फॉर सर्टिफाईड पब्लिक अकाऊंट्स यांच्यातील सामंजस्य कराराच्या नूतनीकरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी


 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने इन्स्टिटयूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट ऑफ इंडिया आणि सौदी ऑर्गनायझेशन फॉर सर्टिफाईड पब्लिक अकाऊंट्स यांच्यातील सामंजस्य कराराच्या नूतनीकरणाला कार्योत्तर मंजुरी दिली आहे. 2014 मध्ये हा करार करण्यात आला होता. कंपनी प्रशासन,तांत्रिक संशोधन आणि सल्ला, गुणवत्ता हमी, न्यायवैद्यक लेखा, इस्लामिक वित्तपुरवठा, आणि परस्पर हिताच्या अन्य विषयांवर परस्पर सहकार्याला प्रोत्सहन देण्यासाठी हा करार करण्यात आला होता.

 

प्रमुख परिणाम:

आयसीएआय सदस्य, विद्यार्थी आणि त्यांच्या संघटनांच्या हितासाठी परस्परांना लाभदायक संबंध विकसित करण्यासाठी एकत्रितपणे काम करणे हा यामागील उद्देश आहे.

या करारामुळे आयसीएआय सदस्यांना त्यांचे व्यावसायिक क्षितिज विस्तारण्याची संधी मिळेल. तसेच लेखा परीक्षण व्यवसायाला चालना देणे शक्य होईल.

 

लाभार्थी

आयसीएआयचे  जेद्दाह, रियाध आणि सौदी अरेबिया येथे 3 चॅप्टर असून 200 हून अधिक सदस्य विविध व्यावसायिक स्तरावर कार्यरत आहेत. या करारामुळे ICAI आणि  SOCPA यांच्यात मजबूत संबंधांना चालना मिळेल. यामुळे भारतातील सनदी लेखापालांना अधिक व्यावसायिक संधी उपलब्ध होतील

 

S.Tupe/S.Kane/P.Kor