इंडो जर्मन सेंटर फॉर सस्टेनेबिलिटी (आय जी सी एस) बाबत,भारताचा विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग आणि जर्मनीचे शिक्षण आणि संशोधन मंत्रालय यांच्यात झालेल्या आशयविषयक संयुक्त निवेदनाबाबत केंद्रीय मंत्रिमंडळाला माहिती देण्यात आली. भारताचे केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान आणि भू विज्ञान मंत्री हर्षवर्धन आणि जर्मनीचे शिक्षण आणि संशोधन मंत्री जोहान वांका यांनी या आशयविषयक संयुक्त निवेदनावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या.
मूलभूत आणि उपयोजित विज्ञान संशोधनात भारत आणि जर्मनीच्या वैज्ञांनिकांत सहकार्य वृद्धिगत करण्याचा यामागचा हेतू आहे.अध्यापन, शाश्वत विकास आणि हवामान बदल यावरच्या माहितीचे आदान प्रदान आणि प्रशिक्षण यांचा यात समावेश आहे.भारत आणि जर्मनी यांच्यातले हे केंद्र,इतर विद्यापीठे, संस्था यांच्यासमवेत आपल्या जाळ्याचा विस्तार करून भविष्यातल्या सहकार्याची जोपासना करणार आहे. या केंद्राची यजमान संस्था म्हणून आय आय टी मद्रास कार्यरत राहणार आहे.
N.Sapre/N.Chitale/Anagha