सन्माननीय अतिथी
स्नेही आणि माध्यम प्रतिनिधी,
अलीकडेच ‘असेह‘ येथे भूकंपात जीवित हानी झालेल्याना मी मनापासून श्रद्धांजली अर्पण करतो.
मित्रानो ,
राष्ट्राध्यक्ष जोको विदोदो यांचे त्यांच्या पहिल्या भारत भेटीसाठी मी, स्वागत करतो.
मी जोको विदोदो यांना नोव्हेंबर २०१४ मध्ये सर्वप्रथम भेटलो. दोन्ही देशांच्या भागीदारीमुळे कशा प्रकारचा लाभ दोन्ही देशांना होऊ शकतो यावर आम्ही चर्चा केली.
महामहिम ,
तुम्ही एका उत्कृष्ठ राष्ट्राचे नेते आहेत. जगातील सर्वात लोकप्रिय, लोकशाही, बहुत्व वाद आणि सामाजिक बांधिलकी असलेले मुस्लिम राष्ट्र म्हणून जग इंडोनेशियाला ओळखतं. ही सर्व आपली मूल्ये आहेत.
महामहिम,
ऐतिहासिक काळापासून आपल्या राष्ट्रांनी आणि समाजाने वाणिज्य तसेच संस्कृती क्षेत्रात मजबूत धागे बांधले आहेत. आपण अशा मध्यवर्ती भौगोलिक क्षेत्रात राहतो जे जागतिक बदलाला अनुसरून झपाट्याने राजकीय , आर्थिक आणि धोरणात्मक बदल अंगीकारत आहोत. तुमच्या भेटी मुळे दोन्ही देशांच्या धोरणात्मक संबंधांना मान्यता मिळाली असून इंडो– भारत विभागात समाजाला विशिष्ठ वळण लावण्या साठी शांतता , समृद्धी आणि स्थेर्याने, कृती करण्या साठी तुमची ही भेट महत्वाची आहे.
मित्रांनो ,
पूर्व – कृती धोरणातील इंडोनेशिया हा भारताचा एक मौल्यवान भागीदार असून दक्षिण आशियातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून नावारूपाला येत आहे. तर भारत जगातील सर्वाधिक जलद गतीने वाढणारी मोठी अर्थव्यवस्था आहे. दोन्ही मोठ्या लोकशाही आणि उभरत्या अर्थव्यवस्था असल्याने, आपण आर्थिक आणि धोरणात्मक रुची वाटून घ्यायला हव्यात.
आपण समान आव्हाने आणि समस्यानां तोंड देत आहोत. माझ्या आणि अध्यक्षांच्या सविस्तर चर्चेत आम्ही आज सहकार्यावर जोर दिला .आम्ही संरक्षण आणि सुरक्षेला प्राथमिकता देण्यासंबंधी सहमती दर्शवली. जसे की, दोन्ही समुद्रीतटीय महत्वाची शेजारील राष्ट्रे असल्याने आम्ही समुद्रीय मार्गाच्या सुरक्षा आणि संरक्षणाच्या सहकारिते साठी आणि नैसर्गिक आपतींनां तसेच पर्यावरणीय सुरक्षेसाठी सहमत झालो आहोत. आमचे समुद्रीय सहकार्यावरील संयुक्त वक्तव्य हे या क्षेत्रातील आमची कटिबद्धता आणि धोरणाचे कार्यक्षेत्र निश्चित करते. आमची भागीदारी नक्कीच दहशहतवाद संपुष्टात आणणे, संघटित गुन्हे , नाशिली पदार्थ आणि मानवी विक्री या समस्यांवर तोडगा काढेल.
मित्रानो,
दोन्ही देशांदरम्यान आर्थिक संबंधांना बळकटी आणि विकास साधण्यासाठी नवीन कल्पनांचा स्रोत , व्यापार, भांडवल, आणि परस्पर सामाजिक संबंधांना मी आणि राष्ट्राध्यक्षांनी सहमती दिली आहे.
मी राष्ट्राध्यक्ष विदोदो यांच्या भारतीय कंपन्यांसह माहिती तंत्रज्ञान आणि सॉफ्टवेअर, कौशल्य विकास , औषधे या क्षेत्रात कार्य करण्याला सहमत आहे. आमची दोन्ही राष्ट्रे हि विकसनशील राष्ट्रे असून आम्ही पायाभूत सुविधा , दोन्ही देशांच्या क्षमता लक्षात घेऊन द्वि–मार्गीय गुंतवणूक स्रोत वाढविण्याचे ठरवले आहे.
या अनुषंगाने , मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा एक फोरम विस्तारित आणि उद्योग ते औद्योगिक संबंधांसाठी नवीन क्षितिजे शोधण्यासाठी नेतृत्व करेल. सेवा आणि गुंतवणूक तसेच विभागीय एकात्मिक आर्थिक भागीदारी क्षेत्रात भारत –आशिया मुक्त व्यापार कराराच्या त्वरित अंमलबजावणीसाठी आम्ही सहमत आहोत, या दिशेने उचललेल्या पावलांना अंतिम स्वरूप देणे हे महत्वाचे राहील.
दोन दशकांपूर्वीच्या जुन्या मौल्यवान अंतराळ क्षेत्रातील आमच्यातील सहकार्याला आम्ही ध्यानात ठेवून मी आणि राष्ट्राध्यक्ष विदोदो शाश्वत भागीदारीसाठी मंत्रीस्तरीय यंत्रणा राबविण्यासाठी एक बैठक घेण्याचे निर्देश देत आहोत.
मित्रानो,
आमच्या दोन्ही समाजातील ऐतिहासिक आणि बळकट सांस्कृतिक संलग्नता हा आमचा भागीदारी वारसा असून, राष्ट्राध्यक्ष आणि मी दोघेही आमच्या ऐतिहासिक संबंधांवर संशोधन करण्याच्या महत्वाला पाठींबा देतो. तसेच दोन्ही देशांच्या (भारत –इंडोनेशिया ) विद्यापीठांमध्ये परस्पर अभ्यास कार्यक्रम प्रस्थापित करण्याच्या गतीला संमती दर्शवितो. आम्ही शिष्यवृत्ती आणि प्रशिक्षण कार्यक्रमांच्या विस्ताराला सहमती देतो. व्यक्ती व्यक्तींमधील प्रत्यक्ष संबंध वाढविण्याचे महत्व आम्ही जाणतो आणि म्हणूनच आम्ही गरुडा इंडोनेशीयाच्या थेट मुंबई विमानसेवेचे स्वागत करतो.
महामहिम,
तुम्ही भारताला भेट दिल्याबद्दल मी पुन्हा एकदा आभार मानतो. मी आपले द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत करण्याचे आश्वासन देतो आणि मला विश्वास आहे की, आजची आपली चर्चा आणि हस्ताक्षरीत करारामुळे कृती धोरणाच्या प्रतिबद्धतेला एक नवीन आयाम प्राप्त होईल. मी माझे भाषण संपण्यापूर्वी सर्व इंडोनेशियातील मित्रांचे आभार मानतो . धन्यवाद !
आभारी आहे.
Bhavana Gokhale