Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

इंडिया सेमीकंडक्टर मिशन अंतर्गत आणखी एका सेमीकंडक्टर युनिटला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी


नवी दिल्‍ली, 2 सप्‍टेंबर 2024

 

एक भक्क्कम सेमीकंडक्टर परिसंस्था विकसित करण्याच्या उद्देशाने, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने गुजरातमधील साणंद येथे सेमीकंडक्टर युनिट स्थापन करण्यासाठी केन्स सेमिकॉन प्रायव्हेट लिमिटेडच्या प्रस्तावाला मंजुरी दिली.

प्रस्तावित युनिट 3,300 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीने स्थापन केले जाईल. या युनिटची क्षमता प्रतिदिन 60 लाख चिप्स इतकी असेल.

या युनिटमध्ये उत्पादित चिप्स औद्योगिक, ऑटोमोटिव्ह, इलेक्ट्रिक वाहने, ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स, दूरसंचार, मोबाइल फोन इत्यादीसारख्या विभागांचा समावेश असलेल्या विविध प्रकारच्या ऍप्लिकेशन्सची पूर्तता करतील.

भारतातील सेमीकंडक्टर्स आणि डिस्प्ले उत्पादन परिसंस्थेच्या विकासासाठीचा कार्यक्रम 21.12.2021 रोजी अधिसूचित करण्यात आला होता ज्यासाठी एकूण 76,000 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

जून 2023 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने गुजरातमधील साणंद येथे सेमीकंडक्टर युनिट स्थापन करण्याच्या पहिल्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती.

फेब्रुवारी 2024 मध्ये आणखी तीन सेमीकंडक्टर युनिट्स मंजूर करण्यात आले. टाटा इलेक्ट्रॉनिक्स गुजरातमधील धोलेरा येथे सेमीकंडक्टर फॅब आणि आसाम मधील मोरीगाव येथे एक सेमीकंडक्टर युनिट स्थापन करत आहे. सीजी पॉवर गुजरातमधील साणंद येथे एक सेमीकंडक्टर युनिट उभारत आहे.

सर्व 4 सेमीकंडक्टर युनिट्सचे बांधकाम वेगाने सुरू आहे आणि युनिट्सजवळ एक मजबूत सेमीकंडक्टर परिसंस्था उदयास येत आहे. या 4 युनिट्समध्ये जवळपास 1.5 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होईल. या युनिट्सची एकत्रित क्षमता प्रतिदिन सुमारे 7 कोटी चिप्स इतकी  आहे.

 

* * *

S.Kane/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai