टपाल खात्याअंतर्गंत 100 टक्के केंद्र सरकारचे भाग भांडवल असलेली सार्वजनिक कंपनी म्हणून इंडिया पोस्ट पेमेंट बँक (आयपीपीबी)स्थापन करायला केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली. या प्रकल्पासाठी 800 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. देशातील सुमारे 40 टक्के जनता बँक व्यवहार परिक्षेत्राच्या बाहेर आहे. या जनतेसह सर्व नागरिकांना या प्रकल्पाचा लाभ होणार आहे. संपूर्ण देशात टप्प्याटप्प्याने हा प्रकल्प राबवला जाईल. मार्च 2017 पर्यंत आयपीपीबी रिझर्व्ह बँकेकडून बँकिंग परवाना प्राप्त करेल. त्यानंतर सप्टेंबर 2017 पर्यंत देशभरात 650 पेमेंट बँकेच्या शाखातून सेवा उपलब्ध होईल. मोबाईल, एटीएम, तसेच डिजिटल पेमेंटसहित अत्याधुनिक तंत्रज्ञानाने या शाखा टपाल कार्यालयाशी जोडलेल्या राहतील.
N.Chitale/B.Gokhale