Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

आसियान शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधानांचा द्विपक्षीय कार्यक्रम

क्वालालंपूर येथे सुरु असलेल्या आसियान शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आज चीनचे पंतप्रधान ली कियांग यांना भेटले.

या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांनी आर्थिक मंदी, हवामान बदल आणि आंतरराष्ट्रीय दहशतवाद या मुद्दयासंदर्भातील जागतिक स्थितीचा आढावा घेतला. आर्थिक मंदी असतानाही भारताने आपला विकास दर कायम ठेवला असल्याचे यावेळी चीनच्या पंतप्रधानांनी मान्य केले. पॅरिसमध्ये होणाऱ्या सीओपी-21 परिषदेच्या तयारीचा देखील आढावा घेण्यात आला. मोदींनी यावेळी चीनच्या पंतप्रधानांना सौर भागीदारी उपक्रमासंदर्भात माहिती दिली तसेच त्यांना कार्यक्रमात सहभागी होण्याचे आमंत्रण दिले. दहशतवाद हे सध्या सर्वात मोठे आव्हान असल्याचे दोघांनीही मान्य केले आणि याचा बिमोड करण्यासाठी सर्व आंतरराष्ट्रीय समुदायांनी एकत्रितपणे याचा सामना करण्याची गरज असल्याचे मान्य केले.

दोघांनी यावेळी व्यापार आणि गुंतवणूकीसंदर्भात द्विपक्षीय चर्चा केली. मोदींनी यावेळी चीन सोबतच्या व्यापारातील होत असलेल्या प्रचंड तुटीबाबतच्या चिंतेचा पुनरुच्चार केला. कौशल्य विकास क्षेत्रातील सहकार्याबाबत ही यावेळी चर्चा करण्यात आली.

जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी मध्यान्ह भोजनाचे आयोजन केले होते. भारत आणि जपानमधील द्विपक्षीय संबंध हे जगातील कोणत्याही द्विपक्षीय संबंधांपेक्षा अधिक महत्त्वपूर्ण असल्याचा उल्लेख यावेळी शिंजो यांनी केला. द्विपक्षीय संबंधांबाबतच्या जपानच्या पंतप्रधानांच्या दृष्टिकोनाला नरेंद्र मोदी यांनी सहमती दर्शवली असून शिंजो आबे यांच्या भारत दौऱ्यासाठी आपण आशावादी असल्याचे मोदी यांनी सांगितले. दिल्ली-मुंबई औद्योगिक मार्गिकेसारख्या (डीएमआयसी) महत्त्वपूर्ण उपक्रमांमध्ये जपानची भारतासोबत भागीदारी आहे. जी खूप महत्त्वपूर्ण आहे. क्षेत्रीय संपर्क, सागरी सुरक्षा, आगामी सीओपी-21 शिखर परिषद, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सुधारणा आणि दहशतवादासारख्या अनेक महत्त्वपूर्ण मुद्दयांवर यावेळी चर्चा करण्यात आली.

S.Mhatre/S.Tupe/N.Sapre