Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

आसियान-भारत शिखर परिषदेत पंतप्रधानांचे उद्‌घाटनपर भाषण

आसियान-भारत शिखर परिषदेत पंतप्रधानांचे उद्‌घाटनपर भाषण

आसियान-भारत शिखर परिषदेत पंतप्रधानांचे उद्‌घाटनपर भाषण

आसियान-भारत शिखर परिषदेत पंतप्रधानांचे उद्‌घाटनपर भाषण

आसियान-भारत शिखर परिषदेत पंतप्रधानांचे उद्‌घाटनपर भाषण

आसियान-भारत शिखर परिषदेत पंतप्रधानांचे उद्‌घाटनपर भाषण

आसियान-भारत शिखर परिषदेत पंतप्रधानांचे उद्‌घाटनपर भाषण

आसियान-भारत शिखर परिषदेत पंतप्रधानांचे उद्‌घाटनपर भाषण

आसियान-भारत शिखर परिषदेत पंतप्रधानांचे उद्‌घाटनपर भाषण

आसियान-भारत शिखर परिषदेत पंतप्रधानांचे उद्‌घाटनपर भाषण

आसियान-भारत शिखर परिषदेत पंतप्रधानांचे उद्‌घाटनपर भाषण


महामहिम पंतप्रधान मोहम्मद नजीब बिन तुन अब्दुल रज्जाक

महामहिम,

या शिखर परिषदेचे यजमानपद स्विकारबद्दल धन्यवाद. मी या परिषदेचे उत्कृष्ट व्यवस्थापन आणि आदरातिथ्य तसेच अभियान आणि पूर्व आशिया शिखर परिषदेतील आपल्या नेतृत्वाचेही कौतुक करतो.

दुहेरी दु:खद घटनांतून सावरताना, मलेशियाने आर्थिक ताकदीने पुन्हा उभे राहण्याच्या संकल्पाने हृदय दर्शन घडवले आहे.

क्वालांलपूर हे आशियाई पुनरुत्थान आणि या विभागाच्या उज्ज्वल भविष्याचं प्रतिक आहे.

आसियान समुदायाच्या निर्मितीच्या या ऐतिहासिक क्षणासाठी शुभेच्छा.

नेहमीप्रमाणेच आसियान विभागीय सहकार्य आणि एकात्मतेसाठी प्रेरणा आणि नेतृत्व पुरवत आहे. आणि भारताच्या दृष्टीकोनातून आशिया आणि प्रशांत विभागात एकात्मिकतेसाठी आसियान ची मूल्य आणि नेतृत्व केंद्र स्थानी राहील. महामहिम, माझी ही दुसरी आसियान -भारत शिखर परिषद असून त्यात सहभागी होताना मला आनंद होत आहे. ने. पी. ताव मधल्या माझ्या या आधीच्या शिखर संमेलनात, मी आपल्या संबंधातील शक्ती आणि आपल्यातील भागीदारीची क्षमता पाहिली होती. आणि भारत-आसियान धारेणात्मक भागीदारी प्रती तुम्ही दर्शविलेली कटीबध्दता आणि विश्वास अधिक महत्वपूर्ण होता.

बहुआयामी जागतिक आव्हाने, आर्थिक अनिश्चितता, राजकीय अस्थैर्य आणि सुरक्षा विषयक धमक्यांच्या काळात आपण भेटत आहोत.

या कठीण काळात, भारत आणि आसियान हे आशेचे दोन किरण आहेत.

भारत ही जगातील सर्वात वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था आहे. भारताचा विकास दर 7.5 टक्क्यांना स्पर्श करत आहे आणि यात अधिक वाढ होण्याची शक्यता आहे. आमच्या चलनवाढीच्या दरात तसच वित्तीय आणि परदेशी तूटीतही घट झाली आहे.

भारतात परिवर्तनाचा आयाम विशाल आहे आणि त्यामुळेच भारतात आर्थिक संधीचा आकारही अधिक व्यापक आहे.

आणि आता आमच्याकडे खुले आणि स्वागतशील वातावरण आहे. यामुळे जागतिके बॅकेच्या सुलभ व्यापाराच्या मानांकनात भारताच्या श्रेणीत वेगाने सुधारणा झाली आहे आणि आम्ही अधिक गतीने सुधारणा करत राहू.

आसियान देशांच्या अर्थव्यवस्थांचा गतिमान विकास कायम आहे.

आम्ही आपल्या 1.9 अब्ज जनतेची समृध्दी अधिक सुदृढ करु, यात शंकाच नाही.

महामहिम,

काही काळ आलेल्या मंदीनंतर आता 2014-15 या वर्षात आमचा व्यापार 76.5 अब्ज अमेरीकन डॉलर्स पर्यंत पोहोचला आहे. आणि दोन्ही बाजूंची गुंतवणूकही अंतर्गत आणि बाहय अशा दोन्ही बाबींकडे आसियान हा सर्वात मोठा गुंतवणुक भागीदार राहीला आहे. मात्र आर्थिक भागीदारीसाठीच्या अनेक क्षमतांची अजून पडताळणी व्हायची आहे. मला खात्री आहे की, आपल्या अर्थव्यवस्था जशा वृध्दींगत होतील, तसाच आपल्या मधील व्यापार आणि गुंतवणुकही व्यापक होईल.

महामहिम,

आपल्या सहकार्याबाबतच्या आराखडयासंदर्भात झालेल्या प्रगतीबाबतही मी समाधानी आहे. या संदर्भात जुलै 2015 मध्ये सेवा क्षेत्र आणि गुंतवणुकीबाबतचे करार आमच्या व्यापारासाठी महत्वपूर्ण पुढचे पाऊल आहे. तसंच संतुलित आणि महत्वाकांक्षी प्रादेशिक सर्वंकष आर्थिक भागीदारी कराराबाबतच्या चर्चेच्या दिशेनं होणारी प्रगतीही आशादायी आहे, ज्यात वस्तू आणि सेवा तसच गुंतवणुकीचाही अंतर्भाव असणार आहे.

समृध्दीसाठी आणि संपर्क जोडले जाणे हा एक प्रमुख मार्ग आहे. त्रिपक्षीय महामार्ग प्रकल्प चांगली प्रगती करत आहे आणि हा प्रकल्प 2018 पर्यंत पूर्ण व्हायला हवा. भारत आणि आसियान दरम्यान, भौतिक आणि डिजिटल संपर्क प्रस्थापति करणा-या प्रकल्पांना चालना देण्यासाठी 1 अब्ज डॉलर्सचं कर्ज सहाय्य देण्यासाठी वचनबध्द असण्याचा प्रस्तावही मांडतो. जसे मी यापूर्वी आम्ही कंबोडिया, लाओस, म्यानमार आणि व्हिएतनाम यांच्याशी आमच्या भागीदारीवर विशेष जोर दिला होता. क्षमता संवर्धन प्रकल्पांमधील आमची भागीदारी त्यांचा विस्तार करेल. या शिवाय सीएलएमव्ही देशांमध्ये निर्मिती केंद्र विकसित करण्यासाठी प्रकल्प विकास निधी उभारण्याचा आमचा मानस आहे.

महामहिम – विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवे शोध हे आमचे सहकार्याचे महत्वपूर्ण स्तंभ असून ते आमच्या आर्थिक भागीदराला आधार देतात. आम्ही आसियान -भारत विज्ञान आणि तंत्रज्ञान विकास निधीचा विस्तार करुन हा निधी सध्याच्या 1 दशलक्ष अमेरीकन डॉलर्स वरुन 5 दशलक्ष अमेरीकन डॉलर्स करणार आहोत. कमी खर्चिक तंत्रज्ञान, तंत्रज्ञान हस्तांतरण तसच संशोधन विकास प्रकल्पाचं व्यवसायिकरण करण्यासाठी आसियान- भारत संशोधन मंच स्थापन करण्याची आमची इच्छा आहे.

व्हिएतनाम मध्ये स्थापन होणारा आमचा अंतरीक्ष सहकार्य प्रकल्प वेगाने प्रगती करत आहे. हा प्रकल्प लवकरच पूर्ण होईल, असा विश्वास मी आपल्याला देतो. भारतानं आसियानाला स्वदेशी बनावटीचे GPS Aided Geo Augumental Navigation अर्थात “गगन” देण्याचा प्रस्ताव मांडला आहे. “गगन सेवांमुळे” माहिती मिळते तसेच ठिकाण निर्धारण आणि नेव्हीगेशन क्षेत्रात प्रगत तंत्रज्ञान उपलब्ध होते.

महासागराचा विकास अर्थात नील अर्थव्यवस्था क्षेत्रात आपण भागीदारी करावी, असा प्रस्तावही मी मांडतो. भविष्यातील अर्थव्यवस्थेसाठी हे महत्वपूर्ण ठरेल आणि अन्न सुरक्षा, औषधे, स्वच्छ ऊर्जा यांचा स्त्रोत बनेल. भारतानं या आधीच अनेक सागरी देशांबरोबर सहकार्याचे संबंध प्रस्थापित केले आहे.

महामहीम, आमच्या संशोधन आणि शोधांबाबतच्या प्रयत्नांसमोर समान आव्हाने असली पाहिजेत-व्यापक शहरीकरण, मेगा सिटीज, भविष्यासाठी कौशल्य विकास, अन्न सुरक्षा , पाणी आणि परवडणाऱ्‍या आरोग्य सुविधा.

हवामान बदल हा जागतिक चिंतेचा एक मुद्दा आहे. भारताने महत्वपूर्ण स्वच्छ ऊर्जा प्रकल्प तयार केलेत ज्यात 2022 पर्यंत अक्षय ऊर्जेची 175 मेगावॅट अतिरिक्त क्षमता आणि 2030 पर्यंत गैर-जिवाश्म इंधनाच्या माध्यमातून ऊर्जेच्या गरजेपैकी 40 टक्के वाटा मिळवणे यांचा समावेश आहे.

महामहिम, आजच्या संस्थांमध्ये नवीकरणीय ऊर्जेसाठी 100 हून अधिक कार्यशाळा देऊ करतानाही आम्हाला आनंद वाटेल. मी 122 सौर ऊर्जा समृध्द देशांसमोर एक आंतरराष्ट्रीय आघाडी स्थापण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. ज्याचा शुभारंभ 30 नोव्हेंबरला पॅरीस इथं फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष ओलंद आणि मी करेन. या आघाडीतील आमच्या भागीदारी बद्दलही मी आशावादी आहे.

महामहिम, मी आपल्या संबंधामधील सांस्कृतिक स्तंभांच पुनरुज्जीवन करण्याच्या सामुहिक प्रयत्नांनाही तेवढेच महत्व देतो. आसियान- भारत सांस्कृतिक संबंधांवर जुलै महिन्यात नवी दिल्लीत एका आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. आमचे पूर्वेकडील प्रवेशद्वार शिलाँग इथल्या ईशान्य विद्यापीठात एक अभियान अध्ययन केंद्र स्थापन करण्याचा आमचा प्रस्ताव आहे. भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या यावर्षीपासून देण्यात येणाऱ्या प्रतिष्ठेच्या पुरस्काराचे पहिले मानकारी आसियानचे सरचिटणीस ले.लुआँग मिन आहेत, याचा मला आनंद होतो आहे.

भारत लवकरच सर्व 10 आसियान देशांमध्ये इलेक्ट्रॉनिक व्हिसा सुविधेचा विस्तार करणार आहे.

महामहिम,

आपली भविष्यातील समृध्दी आपले क्षेत्र, महासागर, अंतरीक्ष आणि सायबर विश्वाची सुरक्षा आणि स्थैर्याच्या पायावर उभी आहे. जानेवारी 2015 मध्ये आम्ही पहिल्या आसियान- भारत सायबर सुरक्षा परिषदेचे आयोजन केले होते. ही परिषद या क्षेत्रातील आमच्या सहकार्याचा मुख्य आधार असेल.

1982 च्या संयुक्त राष्ट्रसंघ सागरी करारासहित आंतरराष्ट्रीय कायद्याच्या स्वीकृत सिध्दांतानुसार विना अडथळा व्यापार आणि नेव्हिगेशनचे स्वातंत्र्य या प्रती कटीबध्दतेनं भारत आसियान सोबत आहे. क्षेत्रीय विवाद हे शांततापूर्ण मार्गानं सोडवले पाहिजेत.

दक्षिण चीन सागर संबंधित वादांशी जोडले गेलेले सर्व पक्ष दक्षिण चीन सागरातील पक्षांच्या आचारसंहितेबाबतच्या अंमलबजावणीबाबतच्या मार्गदर्शक तत्वांशी बांधील राहतील, अशी भारताला आशा आहे. आणि या संदर्भात सर्व सहमती व्हावी, यासाठी आचार संहिता त्वरीत अंमलात यावी या साठी दुप्पट प्रयत्न करेल.

आपण सागरी सुरक्षा, सागरी चाचेगिरीशी मुकाबला, तसच मानवीय आणि आपत्ती मदत क्षेत्रात विशेष सहकार्य विकसित करायला हवं. दहशतवाद हे जागतिक पातळीवरील मोठं आव्हान उभे ठाकले आहे. ज्याचा परिणाम आपल्या सर्वांना सोसावा लागत आहे. आसियान सदस्यांशी आमचे उत्तम द्विपक्षीय सहकार्य आहे आणि विभागीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर दहशतवाद निपटून काढण्यासाठी आपण आपल्या सहकार्यानं किती वाढ करतो, हे पाहणे गरजेचे आहे. यासाठी आंतरराष्ट्रीय दहशतवादाबाबत एक व्यापक करार स्वीकारण्यासाठी आपण समर्थन द्यायला हवं.

महामहिम, झपाटयाने बदलणारी प्रादेशिक व्यवस्था आणि अनिश्चित कालखंडात, एका शांततामय आणि समृध्द भविष्यासाठी आपण या क्षेत्रातील रुपरेषा निश्चित करण्यासाठी आसियानच्या नेतृत्वाविषयी आशावादी आहोत.

महामहिम, आपल्या उपस्थितीबाबत मी आभार मानतो आणि भारत या भागीदारीला सर्वोच्च प्राधान्य देत आहे हया कटीबध्दतेचा पुनरुच्चार करुन मी या संबोधनाचा समारोप करु इच्छितो आणि या साठीच आम्ही जकार्ता मध्ये कायमस्वरुपी आसियान दूतावासाची स्थापना केली आहे.

आपल्या सहकार्याच्या कार्यसूचीला आपण कसे विकसित करु शकतो, या संदर्भातील आपले विचार जाणून घेण्यासाठी मी उत्सुक आहे.

धन्‍यवाद !

J.Patankar/S.Tupe/N.Sapre