अरुणाचल प्रदेश आसाम आणि त्रिपुरा दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुवाहाटीला भेट दिली. ईशान्य गॅस ग्रीडचे त्यांनी भूमिपूजन केले. राज्यातल्या अनेक विकास प्रकल्पांचे त्यांनी उद्घाटन केले. ईशान्येकडच्या राज्यांच्या इतिहासात नवा अध्याय आहे या प्रदेशाच्या वेगवान विकासाला आपल्या सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे पंतप्रधानांनी यावेळी बोलतांना सांगितले. आसामची विकासाच्या मार्गावर वाटचाल सुरू असल्याचे ते म्हणाले. अंतरिम अर्थसंकल्प ईशान्येकडच्या राज्यांच्या 21 टक्क्यांपेक्षा जास्त वाढवून सरकारची कटिबद्धता यातून प्रतीत होत असल्याचे पंतप्रधान म्हणाले.
ईशान्येकडच्या राज्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सरकार कटिबद्ध आहे असे सांगून इथली संस्कृती आणि भाषा रक्षणासाठी कटिबद्ध असल्याचे पंतप्रधान म्हणाले. नागरिकत्व विधेयकाविषयी बोलताना या विधेयकासंदर्भात अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन त्यांनी केले. 36 वर्षानंतर सुद्धा कराराची अंमलबजावणी झाली नाही केवळ मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार ही आश्वासने पूर्ण करेल. राजकीय लाभ आणि एकगठ्ठा मतांसाठी आसामच्या जनतेच्या भावनांशी खेळ करू नका असे आवाहन त्यांनी राजकीय पक्षांना केला नागरिकत्व सुधारणांमुळे ईशान्येकडच्या राज्यांना कोणतेही नुकसान पोहोचणार नाही असे आश्वासन त्यांनी दिले आसाम करार लागू करण्याची मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन पंतप्रधानांनी दिले. चौकीदार, भ्रष्टाचाराविरोधात कारवाई करत आहे. आधीच्या सरकारने भ्रष्टाचाराला वाव दिला मात्र आपले सरकार समाजातून याचे उच्चाटन करत आहे.
ईशान्य गॅस ग्रिडची पायाभरणी पंतप्रधानांनी केली. या ग्रिडमुळे या प्रदेशाला नैसर्गिक वायुचा अखंड पुरवठा आणि औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहे. तिवसुखिया इथे होलांग मॉड्युलर गॅस प्रक्रिया सयंत्राचे उद्घाटन पंतप्रधानांनी केले. याद्वारे आसाममध्ये उत्पादित होणाऱ्या नैसर्गिक वायू उत्पादनापैकी 15 टक्के वायू यातून पुरवला जाईल. नुमालीगड इथे एनआरएल बायोरिफायनरी आणि बिहार, पश्चिम बंगाल, सिक्कीम आणि आसाम मधून जाणाऱ्या 729 किलोमीटरच्या बरौनी-गुवाहाटी गॅस पाईपलाईनची पायाभरणी पंतप्रधानांनी केली.
देशभरात बांधण्यात येणाऱ्या 12 बायो रिफायनरी पैकी नुमालीगडची बायो रिफायनरी सर्वात मोठी असेल. या सुविधांमुळे तेल आणि नैसर्गिक वायू केंद्र म्हणून पुढे येईल आणि भारताच्या अर्थव्यवस्थेला चालना देईल असे पंतप्रधान म्हणाले. दहा टक्क्यांपर्यंत इथेनॉल मिश्रण योजनेवर सरकारचे काम सुरू आहे.
कामरुप, काचेर, हलाईकंडी आणि करीमगंज जिल्ह्यात सिटी गॅस वितरण नेटवर्कसाठी पंतप्रधानांनी भूमिपूजन केले. 2014 मध्ये केवळ 25 लाख पीएनजी जोडण्या होत्या. केवळ चार वर्षात ही संख्या 46 लाख झाल्याचे ते म्हणाले. याच काळात सीएनजी रिफिलींग स्टेशनच्या संख्येत 950 वरुन 1500 पर्यंत वाढ झाली आहे.
ब्रह्मपुत्रा नदीवरच्या सहा पदरी पुलाचे भूमीपूजनही पंतप्रधानांच्या हस्ते झाले. ब्रह्मपुत्रा नदीवरच्या या पुलामुळे प्रवासाचा वेळ दीड तासावरुन पंधरा मिनिटांपर्यंत येणार आहे.
गोपीनाथ बोरदोलोई आणि भूपेन हजारिका यांना भारतरत्न प्रदान करण्याचा आपल्या सरकारला अभिमान आहे. भूपेन हजारिका यांना त्यांच्या हयातीतच हा सन्मान मिळू शकला असता मात्र आधीच्या सरकारच्या काळात काही लोकांना जन्मतःच भारतरत्न सन्मान राखून ठेवण्यात येत होता. देशासाठी आयुष्य वेचणाऱ्या व्यक्तींना हा सन्मान प्राप्त होण्यासाठी दशकांचा कालावधी लागत असे असं पंतप्रधान म्हणाले.
B.Gokhale/N.Chitale/P.Malandkar
When it comes to Bharat Ratnas, those who ruled the nation for 55 years had a fixed approach- the award for some was reserved the moment they were born while others were ignored.
— Narendra Modi (@narendramodi) February 9, 2019
Atal Ji’s Government and the present NDA Government honoured two greats from Assam. pic.twitter.com/ythLqhNcnq
Spoke to my sisters and brothers of Assam on aspects of the Citizenship (Amendment) Bill and also assured them that the interests of Assam and other parts of the Northeast will always be protected. pic.twitter.com/bHDa3aSThL
— Narendra Modi (@narendramodi) February 9, 2019
During Congress rule, the headlines from the Northeast indicated sheer neglect and apathy. The headlines now reflect positivity and development.
— Narendra Modi (@narendramodi) February 9, 2019
Congress has zero respect for Assam’s culture. They had no will to implement important parts of the Assam Accord.