नवी दिल्ली, 18 फेब्रुवारी 2025
आसाममध्ये जोगीघोपा येथे ब्रह्मपुत्रा नदीवरील (राष्ट्रीय जलमार्ग क्र.2) अंतर्गत जलमार्ग टर्मिनलचे (आयडब्ल्यूटी) उद्घाटन झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक व्यक्त केले.
भूतानचे अर्थमंत्री ल्योनपो नामग्याल दोरजी यांच्यासह केंद्रीय बंदरे,नौवहन आणि जलमार्ग तसेच आयुष मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी आसाममध्ये जोगीघोपा येथे अंतर्गत जलमार्ग टर्मिनलचे (आयडब्ल्यूटी) उद्घाटन केले. बहु-पद्धतीय लॉजिस्टिक्स पार्कशी जोडलेले आणि अत्यंत धोरणात्मक विचारांतून जोगीघोपा येथे उभारण्यात आलेले हे अत्याधुनिक टर्मिनल भूतान आणि बांगलादेश साठी गरजेचे आंतरराष्ट्रीय बंदर असेल. तसेच हे टर्मिनल आसाम आणि ईशान्य प्रदेशातील लॉजिस्टिक्स आणि कार्गो वाहतुकीत सुधारणा घडवून आणेल.
केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी एक्स मंचावर लिहिलेल्या संदेशाला प्रतिसाद देत पंतप्रधान मोदी या मंचावर लिहितात:
“पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याच्या तसेच प्रगती आणि समृद्धीसाठी अंतर्गत जलमार्गांना प्रोत्साहन देण्यासाठीच्या आमच्या प्रयत्नांमध्ये पडलेली एक उल्लेखनीय भर”
A noteworthy addition in our quest for improving infrastructure as well as encouraging inland waterways for progress and prosperity. https://t.co/2heHuWxagw
— Narendra Modi (@narendramodi) February 18, 2025
S.Patil/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
A noteworthy addition in our quest for improving infrastructure as well as encouraging inland waterways for progress and prosperity. https://t.co/2heHuWxagw
— Narendra Modi (@narendramodi) February 18, 2025