Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांना ग्लोबल फायनान्स सेंट्रल बँकर रिपोर्ट कार्ड्स 2023 मध्ये “A+” दर्जा मिळाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन


नवी दिल्ली, 1 सप्टेंबर 2023

भारतीय रिझर्व बँकेचे (आरबीआय) गव्हर्नर शक्तीकांत दास यांना ग्लोबल फायनान्स सेंट्रल बँकर रिपोर्ट कार्ड्स 2023 मध्ये “A+” दर्जा मिळाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. A+ मानांकन मिळालेल्या तीन मध्यवर्ती बँकांच्या गव्हर्नरांच्या यादीत, दास यांना शीर्षस्थान देण्यात आले आहे.

भारतीय रिझर्व बँकेच्या ट्वीटला प्रतिसाद देताना पंतप्रधानांनी ट्वीट केले आहे:

“आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांचे अभिनंदन. हा भारतासाठी अभिमानाचा क्षण आहे, जो जागतिक स्तरावरील आपले  आर्थिक नेतृत्व प्रतिबिंबीत करतो. त्यांचे समर्पण आणि दूरदृष्टी आपल्या देशाच्या विकास प्रक्रियेला बळ  देत  आहे.