Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

आयुष्मान भारत योजनेला नागरिकांनी दिलेला प्रतिसाद पंतप्रधानांनी केला शेअर


नवी दिल्‍ली, 6 ऑक्‍टोबर 2022

 

आयुष्मान भारत योजनेला नागरिकांनी दिलेला प्रतिसाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेअर केला आहे. सर्व भारतीय नागरिकांना 5 लाख रुपयांपर्यंतचे विमा कवच पुरवणाऱ्या या योजनेचे लाभ नागरिकांना देशभरात कुठेही मिळू शकतात, असे मतही पंतप्रधानांनी नोंदवले आहे.

आयुष्मान भारत योजना गरिबांसाठी वरदान ठरली आहे, अशा आशयाचे एका नागरिकाचे ट्वीट शेअर करत, पंतप्रधानांनी त्याला प्रतिसाद दिला आहे–

“हे तर खरेच आहे. त्याचबरोबर, महत्वाचे म्हणजे या योजनेचे लाभ नागरिक देशभरात कुठेही घेऊ शकतात.”

 

* * *

M.Pange/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai