Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

आयुषमान भारत योजनेच्या उद्‌घाटनपूर्व तयारीचा पंतप्रधानांकडून आढावा

आयुषमान भारत योजनेच्या उद्‌घाटनपूर्व तयारीचा पंतप्रधानांकडून आढावा


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आयुषमान भारत योजनेच्या उद्‌घाटनपूर्व तयारीचा आढावा घेतला. या राष्ट्रीय आरोग्य संरक्षण योजनेची घोषणा अलिकडेच अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

दोन तासापेक्षा जास्त काळ चाललेल्या या उच्चस्तरीय बैठकीत प्रधानमंत्री कार्यालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय तसेच नीति आयोगाने योजनेची अंमलबजावणी करण्याविषयी सुरु असलेल्या कामांबाबत आढावा घेतला आणि पंतप्रधानांनी झालेल्या कामाची प्रशंसाही केली.

या योजनेमुळे देशातील प्रत्येक कुटुंबाला 5 लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळणार आहे. 10 कोटीपेक्षा जास्त गरीब आणि उपेक्षित कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळू शकेल. लाभधारकांना देशभरात रोखरहित आरोग्य सेवांचा लाभ घेता येणार आहे.

आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून प्राथमिक आरोग्य सुविधा प्रदान करण्याच्या कामाचाही पंतप्रधानांनी आढावा घेतला.

सर्व संबंधितांनी योजनेच्या सुविहित अंमलबजावणीसाठी लक्षवेधी पद्धतीने काम करावे आणि समाजातील गरीब वर्गाला या योजनेचा लाभ मिळवून द्यावा, असे आवाहन पंतप्रधानांनी केले.

B.Gokhale/M.Pange/D.Rane