Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

आयसीएआरडीए कडून मध्यप्रदेशातल्या आम्लहा, सिहोर इथे एफएलआरपी उभारण्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी


मध्य प्रदेशात,आम्लहा,सिहोर इथे फूड लिजुमे रिसर्च प्लॅटफॉर्म (FLRP)तर पश्चिम बंगाल मधे डाळीसाठी आणि राजस्थानमध्ये नैसर्गिक संसाधन व्यवस्थापनासाठी उपग्रह केंद्र उभारायला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. कोरड्या भागातल्या कृषी संशोधनासाठीच्या आंतरराष्ट्रीय केंद्राकडून (ICARDA) दुसऱ्या टप्प्यात ही उभारणी केली जाणार आहे. अन्न सुरक्षा विषयक वाढत्या आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी आंतरराष्ट्रीय विज्ञानातल्या सर्वोत्तम बाबींची सांगड भारतात FLRP उभारल्यामुळे घातली जाणार आहे. FLRP मुळे देशातले संशोधन झपाट्याने आत्मसात केले जाणार आहे. मोठया आंतरराष्ट्रीय संशोधन आणि विकास केंद्रामुळे भारत, जगातले आणखी मोठे कृषी संशोधन ठरायला मदत होणार असून त्यामुळे देशात संशोधन आणि विकास क्षेत्रात आणखी गुंतवणूक व्हायला चालना मिळणार आहे.

A.Sharma/S.Tupe/N.Chitale/Anagha