Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

आयएएस प्रशिक्षणार्थीनी महात्मा गांधींचा मंत्र ध्यानी धरावा – पंतप्रधान

आयएएस प्रशिक्षणार्थीनी महात्मा गांधींचा मंत्र ध्यानी धरावा – पंतप्रधान


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतीय प्रशासनिक सेवेतल्या 2015 च्या तुकडीतल्या 181 प्रशिक्षणार्थींबरोबर संवाद साधला.

या प्रशिक्षणार्थींनी, निर्णय घेताना महात्मा गांधीजींचा, गरीबातल्या गरीबाचे कल्याण साधण्याचा मंत्र ध्यानात ठेवावा असे पंतप्रधान म्हणाले.

भारतीय प्रशासकीय सेवेत दाखल होण्यापूर्वी अनेक प्रशिक्षणार्थींनी खाजगी क्षेत्रात काम केले आहे याची दखल घेत त्यांचे याआधीचे काम म्हणजे नोकरी होती तर आता ते सेवेत दाखल होत आहेत.

ईशान्येकडच्या राज्यांच्या प्रगती आणि दळणवळणाच्या महत्त्वावर भर देतानाच ईशान्येकडच्या राज्यांची प्रगती झाली तर संपूर्ण देशाची आगेकूच जोमाने होईल असे पंतप्रधान म्हणाले.

गेल्या चार दशकात केलेली भारत भ्रमंती आणि गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून घेतलेला अनुभव पंतप्रधान म्हणून काम करताना आपल्याला उपयुक्त ठरल्याचे एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी सांगितले.

N.Chitale/S.Tupe/M.Desai