Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

“आयएएलए”चा दर्जा बदलण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ मरीन एडस टू नॅव्हिगेशन अॅंड लाईट हाऊस या ‘एनजीओ’ म्हणजेच अशासकीय संस्थेचा दर्जा बदलण्यास मान्यता देण्यात आली. आता या संस्थेला ‘आयजीओ’ म्हणजेच आंतर-शासकीय संस्थेचा दर्जा देण्यात येणार आहे.

यामुळे नौवहनाच्या वाहनांच्या सुरक्षित, आर्थिक आणि कार्यक्षम व्यवहाराला चालना मिळू शकणार आहे.

पार्श्वभूमी

फ्रान्समध्ये मुख्यालय असलेल्या ‘आयएएलए’ची स्थापना 1957 मध्ये फ्रेंच कायद्यानुसार झाली होती. एकूण 83 राष्ट्रे या संस्थेचे सदस्य आहेत. तर या संस्थेच्या परिषदेमध्ये 24 राष्ट्रीय सदस्य असून त्यामध्ये भारताचाही समावेश आहे.

संस्थेचा अशासकीय दर्जा बदलून तो आंतर-शासकीय संस्था केल्यामुळे भारताला 21 व्या शतकातील सर्वोत्कृष्ट सेवा मिळू शकणार आहे.

N.Sapre/S.Bedekar/Anagha