Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

आयआयटी मद्रासच्या 56व्या दीक्षांत समारंभात पंतप्रधानांचे संबोधन


आयआयटी मद्रासच्या 56व्या दीक्षांत समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संबोधित केले.

आपल्यासमोर आज भारताचे छोटे रुप आणि नव भारताचे चैतन्य आहे. इथे उत्साह आणि सकारात्मकता आहे. तुमच्या डोळ्यात मला भविष्याची स्वप्ने दिसत आहेत, भारताचे भविष्य मला त्यात दिसत आहे. पदवी प्राप्त विद्यार्थ्यांचे त्यांच्या पालकांचे आणि शिक्षकांचे तसेच सहाय्यक कर्मचाऱ्यांचेही त्यांनी अभिनंदन केले. सहाय्यक कर्मचाऱ्यांच्या भूमिका आपल्याला अधोरेखित करायची आहे. आपले जेवण करणारा वर्ग आणि वसतीगृह शांतपणे स्वच्छ ठेवणारा हा वर्ग आहे.

भारताच्या युवा वर्गाच्या क्षमतेवर विश्वास आहे. अमेरिका दौऱ्यादरम्यानच्या चर्चेत एक समान धागा होता तो म्हणजे नव भारताविषयीच्या आशा. भारतीय समुदायाने जगात विशेषत: विज्ञान, तंत्रज्ञान आणि नाविन्यता या क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. यातले अनेक आपले आयआयटीतले वरिष्ठ आहेत. जगात ब्रँड इंडिया आपण दृढ करत आहात.

आज भारत 5 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था होण्यासाठी प्रयत्न करत आहे. नाविन्यता, तंत्रज्ञानाची आकांक्षा यामुळे हे स्वप्न पूर्ण होईल, अर्थशास्त्र आणि उपयुक्तता यांचा सुंदर मिलाफ म्हणजे भारतातली नाविन्यता आणि कल्पकता असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

देशात नाविन्यता आणि संशोधनाला पोषक व्यवस्था निर्माण करण्यासाठी काम सुरु आहे. अनेक संस्थांमधे अटल इनक्युबेशन केंद्र निर्माण करण्यात येत आहेत. आता पुढचे पाऊल म्हणजे स्टार्ट अपसाठी बाजारपेठ शोधण्याचे आहे.

आपल्या कठोर मेहनतीने अशक्य ते शक्य केले आहे. आपल्यापुढे अनेक संधी आहेत, त्या सर्वच सहजसाध्य नाहीत. मात्र स्वप्ने पाहणे सोडू नका, स्वत:लाच आव्हान देत रहा. त्यामुळे स्वत:त सुधारणा घडते असे पंतप्रधान म्हणाले.

आपण कुठे काम करता, कोठे राहता याने फरक न पडता आपल्या मातृभूमीच्या गरजा सदैव ध्यानात ठेवा. आपले काम, संशोधन, नाविन्यता आपल्या मातृभूमीसाठी कसे उपयुक्त ठरेल, याचा विचार ठेवा. ही सामाजिक जबाबदारी आहे.

आज एक समाज म्हणून आपण एकदाच वापरता येणाऱ्या प्लास्टिकपासून मुक्ती मिळवायला हवी. या एकदाच वापरता येणाऱ्या प्लॅस्टिकचे दुरुपयोग टाळून, पर्यावरणस्नेही काय पर्याय असेल, यासाठी आपल्यासारख्या युवापिढीकडे आम्ही पाहत आहोत, तंत्रज्ञानाबरोबर डाटा विज्ञान, वर्तनात्मक शास्त्र आले, तर उत्तम निकाल हाती येऊ शकतो, असे पंतप्रधान म्हणाले.

लोकांचे दोन प्रकार असतात एक म्हणजे जे जगतात आणि एक आहेत, ज्यांचे अस्तित्व असते, हे स्वामी विवेकानंदाचे विचार मांडत जे इतरांसाठी जगतात त्यांचे आयुष्य आनंदी आणि परीपूर्ण असते असे पंतप्रधान म्हणाले.

शिक्षण ही सतत सुरु राहणारी प्रक्रिया आहे, असे सांगून या संस्थेबाहेर गेल्यानंतरही शिक्षण सुरु ठेवा, असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.

B.Gokhale/N.Chitale/D.Rane