नवी दिल्ली, 15 सप्टेंबर 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (एनडीएमए) आणि इटलीतील नागरी संरक्षण विभागादरम्यान झालेल्या, आपत्तींचा धोका कमी करणे आणि व्यवस्थापन विषयक सामंजस्य कारारविषयी माहिती देण्यात आली.
करारचे लाभः
आपत्तींचा धोका कमी करणे आणि व्यवस्थापन विषयक सहकार्याबाबत झालेल्या या करारावर, भारतातर्फे, एनडीएमए आणि इटलीतर्फे, नागरी संरक्षण विभागाच्या प्रतिनिधींनी स्वाक्षऱ्या केल्या.
या सामंजस्य करारामुळे, एक अशी प्रणाली विकसित केली जाईल, ज्यामुळे भारत आणि इटली या दोन्ही देशांना नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनात मदत मिळू शकेल. आपत्तींचा धोका असलेल्या भागात बचावाची तयारी, प्रतिसाद आणि क्षमता बांधणी यामुळे दोन्ही देशांना त्याचा लाभ मिळेल.
या दोन्ही संस्थांदरम्यान, जून 2021 मध्ये सामंजस्य करार करण्यात आला होता.
* * *
S.Tupe/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com