Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

आदिवासी गौरव दिवस हा मातृभूमीचा सन्मान आणि स्वाभिमान जपण्यासाठी आपल्या आदिवासी समुदायाने दाखवलेल्या अतुलनीय शौर्याचे आणि त्यागाचे प्रतीक आहे: पंतप्रधान नरेंद्र मोदी


आदिवासी गौरव दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्राला उद्देशून केलेले भाषण ऐकण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. आज साजरा केला जात असलेला आदिवासी गौरव दिवस म्हणजे मातृभूमीचा सन्मान आणि स्वाभिमान राखण्यासाठी आपल्या आदिवासी समाजाने दाखवलेल्या अतुलनीय शौर्याचे आणि बलिदानाचे प्रतिक असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

राष्ट्रपती कार्यालयाने X या समाज माध्यमावर लिहिलेल्या संदेशाला प्रतिसाद देताना पंतप्रधानांनी म्हटले आहे :

आदिवासी गौरव दिवस म्हणजे मातृभूमीच्या सन्मानाचे आणि स्वाभिमानाचे रक्षण करण्यासाठी आपल्या आदिवासी समुदायाने दाखवलेल्या अतुलनीय शौर्य आणि बलिदानाचे प्रतीक आहे. या प्रसंगी माननीय राष्ट्रपतींनी राष्ट्राला उद्देशून केलेले भाषण देशवासीयांनी अवश्य ऐकले पाहिजे.”

***

N.Chitale/S.Chitnis/P.Kor

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com