पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाने आठ नवीन आयआयटीच्या स्थापनेसाठी सुधारित प्रस्थापित मूल्याला मंजुरी दिली. या नवीन आयआयटीमध्ये भुवनेश्वर, गांधीनगर, हैदराबाद, इंदौर, जोधपूर, मंडी, पटणा आणि रोपर यांचा समावेश आहे. 2008-09 ते 2018-19 या 11 वर्षांच्या कालावधीदरम्यान 13 हजार 990 कोटी रुपयांचे सुधारित प्रस्थापित मूल्य असलेले आठ आयआयटी स्थापन करण्यात येत आहेत. मूळ प्रकल्पाची किंमत 6 हजार 80 कोटी रुपये असून वेळ आणि मूल्य यांच्या चलनवाढीचे मूल्य 7 हजार 910 कोटी रुपये आहे.
प्रत्येक आयआयटीच्या विद्यार्थ्यांची संख्या 2 हजार 360 ठरविण्यात आली असून एकूण विद्यार्थी संख्या 12 हजार 880 राहील. मार्च 2019 पर्यंत हे सर्व आयआयटी कार्यरत होतील.
B.Gokhale