मंत्रिमंडळामधील माझे सहकारी महेश शर्मा जी, आजाद हिंद फौजेचे सदस्य आणि देशाचे वीरपूत्र आणि आपल्या सर्वांमध्ये उपस्थित असलेले श्रीमान लालटी राम जी, सुभाष बाबूंचे पुतणे भाई चंद्रकुमार बोस जी, ब्रिगेडियर आर.एस. चिकारा जी, आणि इथे उपस्थित असलेले सुरक्षा दलांचे, लष्करातले सर्व माजी अधिकारी, इतर मान्यवर, बंधू आणि भगिनींनो.
आज 21 ऑक्टोबर या ऐतिहासिक दिनी लाल किल्ल्यावर ध्वजावरोहणाची संधी मला मिळाली आहे, याबद्दल मी स्वतःला किती भाग्यवान समजतो, याची आपण कल्पना करू शकता. ज्या स्थानी ‘व्हिक्टरी परेड’ व्हावी, म्हणजे विजयी कवायतीचे स्वप्न नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी 75 वर्षांपूर्वी पाहिलं होतं, तोच हा लाला किल्ला आहे. आजाद हिंद सरकारचे पहिले पंतप्रधान म्हणून शपथ घेताना नेताजींनी घोषणा केली होती की, याच लाल किल्ल्यावर एके दिवशी मोठ्या दिमाखात तिरंगा फडकवला जाणार आहे. आजाद हिंद सरकार अखंड भारताचे सरकार होते. अविभाजित भारताचे सरकार होते. आजाद हिंद सरकारला 75 वर्षे होत असल्याबद्दल मी देशवासियांना खूप-खूप शुभेच्छा देतो.
सहकारी मंडळींनो, आपले ध्येय साध्य करण्यासाठी या व्यक्तीचे ‘व्हिजन’ अगदी स्वच्छ, स्पष्ट होते. निश्चित केलेले ध्येय साध्य करण्यासाठी त्यांनी आपलं सर्वस्व पणाला लावून वाटचालीला प्रारंभ केला होता. जी व्यक्ती फक्त आणि फक्त देशासाठीच समर्पित होती, अशा महान व्यक्तीचे केवळ स्मरण करणेही पिढ्यान् पिढ्यांना प्रेरणादायक ठरणारे आहे. ज्या माता-पित्यांनी नेताजी यांच्यासारख्या सुपुत्राला जन्म दिला, त्यांना मी आज वंदन करतो. ज्यांनी राष्ट्रासाठी बलिदान करणा-या वीर-वीरांगना यांना जन्म दिला. ज्या सैनिकांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये आपल्या सर्वस्वाचे बलिदान केले, या सर्व सैनिकांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्यापुढे मी नतमस्तक आहे. ज्या लोकांनी नेताजींच्या या महान कार्याला तन-मन-धनासह सर्वतोपरी सहकार्य केले होते, अशा संपूर्ण विश्वामध्ये विखुरलेल्या त्या सर्व भारतीवासियांचेही मी आज स्मरण करतो. या लोकांनी स्वतंत्र, समृद्ध, सशक्त भारत निर्माण करण्यासाठी आपले बहुमूल्य योगदान दिले होते.
मित्रांनो, ‘आजाद हिंद सरकार’, हे आजाद हिंद सरकार, म्हणजे काही केवळ नाव नव्हते. नेताजींच्या नेतृत्वाखाली या सरकारव्दारे प्रत्येक क्षेत्राशी संबंधित योजना बनवण्यात आल्या होत्या. या सरकारची आपली स्वतःची बँक होती. आपले चलन होते, आपले टपाल तिकीट होते, आपली गुप्तचर यंत्रणा होती. देशाच्या बाहेर राहून, मर्यादित साधन सामुग्रीच्या मदतीने, शक्तिशाली साम्राज्याच्याविरोधात इतके व्यापक तंत्र विकसित करणे, सशक्त क्रांती, घडवून आणणे मला खूप अभूतपूर्व आणि असाधारण कार्य वाटते.
ज्या राजवटीचा सूर्य कधीच अस्ताला जात नाही, दुनियेतल्या एका मोठ्या भागावर ही राजवट राज्य करीत होती. अशा व्यवस्थेविरूद्ध, शक्तिशाली लोकांविरूद्ध नेताजींनी आपले सरकार तयार केले आणि लोकांना एकजूट केलं. नेताजींनी स्वतः जे काही लिहून ठेवलं आहे, ते जर आपण वाचलं तर अनेक गोष्टी माहिती होतात. वीरतेच्या शीर्षस्थानी पोहोचण्यासाठी त्याचा पाया तर त्यांच्या बालपणीच घातला गेला होता.
1912 या वर्षाच्या आसपास, म्हणजे 106 वर्षांपूर्वी, त्यांनी आपल्या मातेला लिहिलेली चिठ्ठी म्हणजे सुभाषबाबूंच्या मनःस्थितीची साक्ष आहे. त्यांनी भारत गुलामगिरीच्या अवस्थेत आहे, हे पाहून किती वेदना होतात, त्यांना किती बेचैन वाटते, देशाची गुलामगिरी पाहून किती यातना होतात, हे त्या पत्रात नमूद केले आहे. इथं एक लक्षात घेण्यासारखे म्हणजे त्यावेळी सुभाषबाबू केवळ 15-16वर्षांचे होते.
शेकडो वर्षांच्या गुलामगिरीने देशाचे हाल झाले होते. त्याबद्दल वाटणारी पीडा, त्यांनी आपल्या आईला पत्र लिहून व्यक्त केली होती. त्यांनी आपल्या आईला पत्रामध्ये प्रश्न विचारले होते की, ‘‘आई, आपला देशाचे दिवसेंदिवस असेच अधःपतन होत जाणार आहे का?या दुःखद भारत मातेचा एकही पुत्र आपल्या स्वार्थाला पूर्णपणे तिलांजली देवून, आपले संपूर्ण जीवन भारतमातेच्या सेवेसाठी समर्पित करू शकणार नाही का? माते, तू काही तरी बोल. आपण किती काळ असेच निद्रित अवस्थेत राहणार आहोत ?’’ वयाच्या15-16व्या वर्षी सुभाषबाबूजींनी असे प्रश्न आपल्या मातेला विचारले होते.
बंधू आणि भगिनींनो, या पत्रामध्ये त्यांनी आपल्या मातेला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरही दिली होती. त्यांनी आपल्या आईला स्पष्टपणे सांगितलं की, आता आणखी प्रतीक्षा करता येणार नाही. आता असेच निद्रित अवस्थेत राहण्याची ही वेळ नाही. आपल्याला आता आपली जडता सोडावी लागेल, जागृत व्हावेच लागेल. आळसाचा त्याग करावा लागेल. आणि कर्म करावे लागेल. हे विचार15-16वर्षे वयाच्या सुभाषबाबूंचे होते. आपल्या आतमध्ये असलेल्या तीव्र उत्कंठांमुळे किशोरवयीन सुभाषबाबूंना भविष्यात नेताजी सुभाष बनवलं.
नेताजींचा एकच उद्देश होता, एकच मिशन होते- भारताचे स्वातंत्र्य ! भारतमातेला गुलामगिरीच्या बेड्यांमधून मुक्त करणे. ही त्यांची विचारधारा होती आणि हेच त्यांचे कर्मक्षेत्र होते.
मित्रांनो, सुभाषबाबू यांना आपल्या जीवनाचे लक्ष्य निश्चित करण्याचा आणि आपले अस्तित्व समर्पित करण्याचा मंत्र स्वामी विवेकानंद यांच्याकडून आणि त्यांच्या शिक्षणातून मिळाला –
आत्मनो मोक्षार्दम जगत हिताय च – याचा अर्थ असा की, जगाची सेवा केल्यानेच मुक्तीचा मार्ग मोकळा होतो. त्यांच्या चिंतनाचा मुख्य आधार होता तो, जगाच्या सेवेचा. आपल्या भारताची सेवा करण्यासाठी त्यांनी अनेक प्रकारच्या वेदना सहन केल्या. प्रत्येक संकटांना मोठ्या धैर्यानं ते सामोरं गेले. त्यांच्याविरूद्ध रचलेली कट कारस्थाने त्यांनी हिंमतीने मोडून काढली.
बंधू आणि भगिनींनो, सुभाषबाबू सेनानींमध्ये राहिले. त्यांनी काळाप्रमाणे स्वतःमध्येही बदल घडवले आणि आपल्या ध्येयाचे कायम स्मरण ठेवून पावले उचलली. यामुळेच त्यांनी पहिल्यांदा महात्मा गांधी यांच्याबरोबर काँग्रेसमध्ये राहून देशातच कार्य करण्याचा प्रयत्न केला आणि नंतर काळाप्रमाणे बदलून त्यांनी सशस्त्र क्रांतीचा मार्ग निवडला. या मार्गाने स्वातंत्र्याच्या आंदोलनाला आधिक गती देण्यासाठी फार मोठी आणि महत्वपूर्ण भूमिका पार पाडली.
सहकारी मंडळींनो, सुभाषबाबूंनी जे काही विश्वमंथन केले, त्याचे अमृत केवळ भारतालाच मिळाले असे नाही तर त्याचा लाभ इतर देशांनाही झाला. जो देश त्यावेळी स्वातंत्र्यासाठी लढत होते, त्यांना सुभाषचंद्र बोस यांच्याकडे पाहून प्रेरणा मिळत होती. त्यांना वाटायचं की, काहीही अशक्य नाही. आपणही असेच संघटित होवू शकतो. इंग्रजांना आव्हान देवू शकतो. स्वतंत्र होवू शकतो. महान स्वातंत्र्य सैनानी नेल्सन मंडेला, भारत रत्न नेल्सन मंडेला जी यांनीही म्हटले आहे की, दक्षिण अफ्रिकेतल्या विद्यार्थी आंदोलनाच्या काळात तेही सुभाषबाबूंना आपण नेता मानत होतो, सुभाषबाबूंना आपण नायक मानत होतो.
बंधू आणि भगिनींनो, आज आपण आजाद हिंद सरकारचा 75वा वर्धापनदिन कार्यक्रम साजरा करीत आहोत. तर चार वर्षांनी म्हणजे2022मध्ये भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होणार आहेत. 75 वर्षांपूर्वी नेताजींनी शपथ घेवून एक निश्चय केला होता की, एक असा भारत निर्माण करण्यात येईल की, त्या भारतामध्ये सर्वांना समान अधिकार असतील. सगळ्यांना समान संधी मिळू शकतील. त्यांनी निश्चय केला होता की, आपल्या प्राचीन परंपरांमधून प्रेरणा घेवून त्यांचा गौरव करून सुखी आणि समृद्ध भारताची निर्मिती करायची आहे. देशाचा समतोल विकास करण्याचा, प्रत्येक क्षेत्रामध्ये विकास करण्याचा त्यांनी निश्चय केला होता. ‘फोडा आणि राज्य करा’ चे राजकारण मूळापासून उखडून टाकण्याचा त्यांनी निश्चय केला होता. ‘फोडा आणि राज्य करा’ अशा स्वरुपाच्या राजनीतीमुळे भारताला अनेक युगे गुलामीमध्ये रहावे लागले होते.
देशाला स्वातंत्र्य मिळून आज इतकी वर्षे झाली आहेत, इतक्या वर्षांनंतरही नेताजींचे स्वप्न अद्याप पूर्ण झालेले नाही. भारत अनेक पावलांनी पुढे गेला आहे. तरीही अजूनही नवीन उंची गाठायची शिल्लक आहेच. हे लक्ष्य गाठण्यासाठी आज भारतामधले सव्वाशे कोटी लोक नवभारताचा संकल्प मनाशी निश्चत करून पुढे जात आहेत. अशाच एका नवीन भारताची कल्पना नेताजी सुभाषचंद्र बोस यांनीही मांडली होती.
आजच्या काळात विध्वंसकारी, विनाशकारी शक्ती देशाबाहेर आणि देशामध्येही आमच्या स्वातंत्र्यावर, एकतेवर आणि घटनेवर प्रहार करीत आहेत. अशावेळी आपण सर्वांनी नेताजींच्या विचारांपासून, कृतींपासून प्रेरणा घेवून, एकजुटीने या विनाशकारी शक्तींच्या विरोधात लढण्याची, त्यांना पराभूत करण्यासाठी पुढे आले पाहिजे. त्याचबरोबर देशाच्या विकासामध्ये आपले संपूर्ण योगदान देण्याचा संकल्पही आपण केला पाहिजे.
मित्रांनो, या संकल्पांबरोबरच आणखी एक गोष्ट महत्वाची गोष्ट आहे. ती म्हणजे राष्ट्रीयत्वाची भावना. भारतीयत्वाची भावना. याच लाल किल्ल्यावर एका खटल्याच्या सुनावणीच्यावेळी आजाद हिंद फौजेचे सेनानी शाहनवाज खान यांनी सांगितले होते की, आपण भारताचे आहोत, याची जाणीव आपल्याला करून देणारी पहिली व्यक्ती सुभाषचंद्र बोस आहेत. भारतीय असल्याची भावना बोस यांनी निर्माण करून दिली.
ज्यांनी भारतातल्या माणसांकडे भारतीय म्हणून पहावे, अशी शिकवण बोस यांनी पहिल्यांदा आपल्याला दिली. आता शाहनवाज खान यांनी ही गोष्ट खटला सुनावणीच्या वेळेस बोलावी, अशी नेमकी कोणती, कशी परिस्थिती निर्माण झाली होती? भारतालाभारतीयांच्या नजरेतून पहावे, समजून घ्यावे, ही आवश्यकता का बरं भासली? या सगळ्या गोष्टींचा उलगडा केला तर आज आपण देशाची परिस्थिती पाहिल्यानंतर अगदी स्पष्टपणे होतो.
बंधू आणि भगिनींनो, केम्ब्रिजमधल्या आपल्या दिवसांच्या आठवणी लिहिताना सुभाषबाबूंनी नोंदवून ठेवले आहे की, आम्हा भारतीयांना शिकवलं जातं की, युरोप, ग्रेट ब्रिटनचेच मोठे स्वरूप आहे. म्हणूनच आपल्याला सवय झाली आहे की, युरोपकडे आपण इंग्लंडच्या चश्म्यातून पाहतो. परंतु आपले दुर्भाग्य म्हणजे, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारत आणि इथली व्यवस्था तयार करताना निर्मिती प्रक्रियेतील लोकांनी भारतालाही इंग्लंडच्या चश्म्यातून पाहिले.
आमची संस्कृती, आमच्या महान भाषा, आमची शिक्षण व्यवस्था, आमचे अभ्यासक्रम, आमची कार्यप्रणाली यांच्यामध्ये झालेल्या संक्रमणामुळे खूप मोठे नुकसान सहन करावे लागले. आज मात्र मी निश्चितपणे सांगू शकतो की, स्वातंत्र्यानंतरच्या काही दशकांमध्ये भारताला जर सुभाषबाबू, सरदार पटेल यांच्यासारख्या व्यक्तित्वांचे मार्गदर्शन मिळाले असते आणि भारताकडे पाहण्यासाठी तो विदेशी चश्मा वापरला गेला नसता तर आज परिस्थिती खूप वेगळीच, भिन्न असती.
मित्रांनो, एकाच कुटुंबाला मोठे बनवण्यासाठी देशाच्या अनेक सुपुत्रांचे, मग त्यामध्ये सरदार पटेल असतील, बाबासाहेब आंबेडकर असतील, त्यांच्याप्रमाणेच नेताजी असतील, या सर्वांचे योगदान विस्मरणात जावे, यासाठी पुरेपूर प्रयत्न केले गेले, ही खूप दुःखद गोष्ट आहे. आता आमचे सरकार ही स्थिती बदलत आहे. आपल्या सर्वांना एव्हाना ठावूक झाले असेलच, इथं येण्यापूर्वी मी राष्ट्रीय पोलिस स्मारकाचा लोकार्पण कार्यक्रम करून आलो. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नावे एक राष्ट्रीय सन्मान देण्याची घोषणा मी या कार्यक्रमामध्ये केली आहे.
आमच्या देशावर ज्यावेळी राष्ट्रीय संकट येते, त्यावेळी आपत्ती व्यवस्थापन आणि मदत तसेच बचाव कार्यामध्ये जे तातडीने सहभागी होतात आणि लोकांचे प्राण वाचवण्यासाठी आपल्या प्राण पणाला लावतात, अशा शूर वीरांना, पोलिस खात्यामधल्या जवानांना आता दरवर्षी नेताजी यांच्या नावाने एक सन्मान देण्यात येणार आहे. देशाची प्रतिष्ठा वाढवणारे आमचे पोलिस जवान, निमलष्करी दलाचे जवान या पुरस्कारासाठी पात्र ठरणार आहेत.
मित्रांनो, देशाचा समतोल विकास साध्य करताना, समाजातल्या प्रत्येक स्तरावर, प्रत्येक व्यक्तीला राष्ट्र निर्माणाची संधी, राष्ट्राच्या प्रगतीमध्ये त्याची भूमिका याविषयी नेताजी यांनी अतिशय विस्तृत विचार केला होता. याविषयी त्यांचा दृष्टिकोन अतिशय व्यापक होता. नेताजी यांच्या मार्गदर्शनाखाली निर्माण करण्यात आलेल्या आजाद हिंद सरकारनेही पूर्व भारताला भारताच्या स्वातंत्र्याचे‘व्दार’ निर्माण केले होते. एप्रिल 1944 मध्ये कर्नल शौकम मलिक यांच्या नेतृत्वाखाली मणिपूरमधल्या मोयरांग येथे आजाद हिंद फौजेने तिरंगा फडकावला होता.
या अशा शौर्याला स्वतंत्रता आंदोलनामध्ये उत्तर-पूर्व आणि पूर्व भारताने जे योगदान दिले आहे, त्याला महत्वाचे स्थान मिळू शकले नाही, हे सुद्धा आमचे दुर्दैवच आहे. विकासाच्या शर्यतीमध्ये देशाचा हा मुख्य भाग मागे पडला. आज मला आनंद होतो की, ज्या पूर्व भारताचे महत्व सुभाषबाबूंनी ओळखले होते, त्याला वर्तमान सरकारही तितकेच महत्व देत आहे. विकासाच्या दिशेला घेवून जात आहे. या क्षेत्राला देशाच्या विकासाचे ‘इंजिन’ बनवण्यासाठी हे सरकार कार्य करत आहे.
बंधू आणि भगिनींनो, मी स्वतःला खूप भाग्यवान मानतो. देशासाठी नेताजींनी जे काही केलं, ते देशासमोर मांडण्याची संधी मला मिळाली. त्यांनी दाखवलेल्या मार्गावरून चालण्याची संधीही मला वारंवार मिळाली. आणि म्हणूनच ज्यावेळी मला आज या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याविषयीचे निमंत्रण मला मिळाले, त्यावेळी ती मला गुजरातमधल्या दिवसांची, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कार्याविषयीच्या स्मृती जागृत झाल्या.
मित्रांनो, ज्यावेळी मी गुजरातचा मुख्यमंत्री होतो, त्यावेळी 2009 मध्ये ऐतिहासिक हरीपुरा काँग्रेस, काँग्रेसच अधिवेशन होते. हरीपुरा काँग्रेस अधिवेशनच्या स्मृती आम्ही एकप्रकारे पुन्हा एकदा जागृत केल्या होत्या. या अधिवेशनामध्ये ज्याप्रकारे सरदार वल्लभभाई पटेल यांनी, गुजरातच्या लोकांनी, नेताजींना काँग्रेसचे अध्यक्ष बनवल्यानंतर बैलगाडीमध्ये बसवून एक खूप मोठी शोभा यात्रा काढली होती. अगदी तशाच प्रकारे, खूप मोठ्या प्रमाणावर, भव्य अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. अगदी त्या काळाचे दृश्य आम्ही पुन्हा एकदा 2009 मध्ये निर्माण केले होते. अधिवेशन झालेल्या स्थानीच सर्व भव्य व्यवस्था करून आम्ही इतिहास पुनर्जीवित केला होता. भले मग ते अधिवेशन काँग्रेसचे होते. परंतु ते क्षण म्हणजे इतिहासाचे एक पान होते. आम्ही तो इतिहास जीवंत करून, प्रत्यक्ष अनुभवून दाखवला होता.
मित्रांनो, स्वातंत्र्यासाठी ज्यांनी बलिदान दिले, ते सौभाग्यशाली होते. आपल्यासारख्या लोकांना अशी संधी मिळाली नाही. मात्र आपल्यासमोर देशासाठी जगण्याचा, देशाच्या विकासासाठी समर्पित होण्याचा एक मार्ग नक्कीच मोकळा आहे. लाखोंनी बलिदान दिल्यानंतर आज आपण स्वराज्याचा अनुभव घेत आहोत. आता आपणा सर्वांवर, सव्वाशे कोटी भारतीयांवर या स्वराज्याचे सुराज्य बनवण्याचे आव्हान आहे. नेताजींनी म्हटले होते की, ‘‘हत्यारांच्या ताकदीवर आणि रक्ताची किंमत मोजून तुम्हाला स्वातंत्र्य मिळवावं लागणार आहे. आणि नंतर ज्यावेळी भारत स्वतंत्र होईल, त्यावेळी देशासाठी तुम्हाला स्थायी सेना बनवावी लागले. या सेनेचे काम, आपले स्वातंत्र्य कायम अबाधित ठेवण्याचे असेल.’’
ज्या प्रकारच्या सेनेचे स्वप्न नेताजी सुभाष बोस यांनी पाहिलं होतं, त्याच प्रकारची सेना निर्माण करण्याचं काम आज भारत करीत आहे, असं मी आज ठाम सांगू शकतो. जोश, उत्साह आणि धडाडी, ही तर आमच्या सेनेची परंपरा आहे, कायमचा भाग आहे. आता त्यालाच आधुनिक हत्यारांची, तंत्रज्ञानाच्या शक्तीची जोड दिली जात आहे. आमच्या सैन्याची शक्ती नेहमीच आत्मरक्षा करण्यासाठी खर्च झाली आहे आणि यापुढेही होत राहील. आम्ही कधीच दुस-या कुणाच्या भूमीचा हव्यास, लोभ धरलेला नाही, हे गत युगांचा इतिहास पाहिला तर लक्षात येईल. मात्र भारताच्या एकतेला, अखंडतेला जर कोणी आव्हान दिले तर मात्र त्याला दुप्पट ताकदीनिशी उत्तर दिले जाईल.
मित्रांनो, लष्कराला सशक्त करण्यासाठी गेल्या चार वर्षात आम्ही अनेक पावले उचलली आहेत. संपूर्ण जगामध्ये सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञान भारतीय लष्कराचा भाग बनवण्यात येत आहे. सेनेची क्षमता असो अथवा शूर जवानांचे जीवन अधिक सुगम आणि सुकर बनवण्याचे कार्य असो. कोणतेही मोठे आणि कठोर निर्णय घेण्याचे धाडस या सरकारमध्ये आहे आणि यापुढेही असेच धोरण सुरू राहणार आहे.‘सर्जिकल स्ट्राईक’पासून ते नेताजी यांच्यासंबंधीच्या फायली सार्वजनिक करण्यापर्यंतचा निर्णय असो, आमच्या सरकारने असे अनेक धाडसी निर्णय घेतले आहेत. आमच्या सरकारने ‘वन रँक वन पेन्शन’ ही सैनिकांची अनेक दशकांपासून प्रलंबित असणारी मागणीही पूर्ण केली, याला इथं उपस्थित असणारे अनेक जवान साक्षी आहेत.
इतकेच नाही, तर जवळपास 11हजार कोटी रूपयांची थकबाकीही माजी सैनिकांपर्यंत पोहोचवण्यात आली आहे. याचा लाभ लाखो माजी सैनिकांना मिळाला आहे. या बरोबरच सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींप्रमाणे निवृत्ती वेतन निश्चित करण्यात आले आहे. तेही ‘ओआरओपी’लागू झाल्यानंतर निश्चित झालेल्या निवृत्ती वेतनाच्या आधारे हा फरक देवू केला आहे. याचा अर्थ माझ्या फौजी बांधवांना निवृत्ती वेतनावर डबर बोनान्झा मिळाला आहे.
माजी सैनिकांचे जीवन अधिक सरल आणि सुगम व्हावे, यासाठी असे अनेक प्रयत्न सरकारच्यावतीने करण्यात आले आहेत. याशिवाय सैनिकांचे शौर्य भावी पिढ्यांना माहीत व्हावे, यासाठी राष्ट्रीय युद्ध संग्रहालयाचे कार्यही आता शेवटच्या टप्प्यात आले आहे.
मित्रांनो, उद्या, म्हणजे 22 ऑक्टोबर रोजी राणी झांशी रेजिमेंटला ही 75 वर्षे पूर्ण होत आहेत. सशस्त्र सेनेमध्ये महिलांनाही बरोबरीने सहभागी होता यावे, यासाठी नेताजी सुभाषचंद्र यांनी पाया रचला होता. देशातली पहिली सशस्त्र महिला रेजिमेंट त्यांनी निर्माण केली. भारताच्या समृद्ध परंपरांविषयी सुभाषबाबूंना अगाध विश्वास होता, त्याचाच परिणाम म्हणजे अनेकजणांकडून होत असलेल्या तमाम विरोधाला न जुमानता त्यांनी महिला सैनिकांकडून मानवंदना स्वीकारली होती.
नेताजींनी जे कार्य 75 वर्षांपूर्वी सुरू केले होते, तेच कार्य अगदी योग्य प्रकारे पुढे नेण्याचे काम आमचे हे सरकार करीत आहे, हे मी आज इथं गर्वाने सांगू शकतो. या 15 आॅगस्ट रोजी याच लाल किल्ल्यावरून मी एक महत्वाची घोषणा केली होती. मी जाहीर केलं की, सशस्त्र सेनेमध्ये ‘शॉर्ट सर्व्हिस कमिशन’च्या माध्यमातून नियुक्त महिला अधिकारींनाही आता पुरूष अधिकारींप्रमाणेच एका पारदर्शी निवड प्रक्रियेव्दारे स्थायी कमिशनमध्ये सहभागी करून घेतले जाईल.
मित्रांनो, गेल्या चार वर्षात आमच्या सरकारने जी पावले उचलली त्याचा विस्तार म्हणजे हे कार्य आहे. मार्च 2016 मध्ये नौदलामध्ये महिला पायलट घेण्याचा निर्णय घेण्यात आला. काही दिवसांपूर्वी नौसेनेच्या धाडसी, शूर सहा महिला अधिकारींना सागरावर स्वार होवून संपूर्ण विश्वाला भारतीय स्त्री-शक्तीचा परिचय करून दिला. याशिवाय देशाला पहिला महिला लढावू वैमानिक देण्याचे कामही या सरकारच्या काळात झाले आहे.
स्वतंत्र भारतामध्ये पहिल्यांदाच भारताच्या सशस्त्र सेनेला सशक्त करण्याची, देखरेख करण्याची जबाबदारीही देशाच्या पहिल्या संरक्षणमंत्री सीतारमण यांच्या हाती आहे, याचा मला खूप आनंद वाटतो.
मित्रांनो, आज आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे सशस्त्र दलांचे कौशल्य आणि समर्पण यामुळे देश संपूर्णपणे सुरक्षित आहे, समर्थ आहे आणि विकासाच्या मार्गावरून योग्य दिशेने, वेगाने आपले ध्येय गाठण्यासाठी धावत आहे.
पुन्हा एकदा आपल्या सर्वांना, देशवासियांना, या महत्वपूर्ण प्रसंगी अगदी हृदयापासून खूप-खूप शुभेच्छा देतो. एकता, अखंडता आणि आत्मविश्वासाचा आमचा हा प्रवास नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आशीर्वादामुळे निरंतर पुढे चालत राहणार आहे.
आपण सर्वांनी माझ्याबरोबर जयघोष करावा, असे आवाहन करतो.
भारत माता की -जय!
भारत माता की -जय!
भारत माता की -जय!
वंदे मातरम् !
वंदे मातरम् !
खूप- खूप धन्यवाद!!
***
B. Gokhale/ S. Bedekar
Members of the Azad Hind Fauj fought valiantly for India’s freedom.
— Narendra Modi (@narendramodi) October 21, 2018
We will always be grateful to them for their courage.
Today, I had the honour of meeting Lalti Ram Ji, an INA veteran. It was wonderful spending time with him. pic.twitter.com/5vjuFTf3BV
It was a privilege to hoist the Tricolour at the Red Fort, marking 75 years of the establishment of the Azad Hind Government.
— Narendra Modi (@narendramodi) October 21, 2018
We all remember the courage and determination of Netaji Subhas Bose. pic.twitter.com/m9SuBTxhPQ
By setting up the Azad Hind Fauj and the Azad Hind Government, Netaji Subhas Bose showed his deep commitment towards a free India.
— Narendra Modi (@narendramodi) October 21, 2018
This spirit of nationalism was a part of him from his young days, as shown in a letter he wrote to his mother. pic.twitter.com/21SxPLW0Rk
All over the world, people took inspiration from Netaji Subhas Bose in their fights against colonialism and inequality.
— Narendra Modi (@narendramodi) October 21, 2018
We remain committed to fulfilling Netaji's ideals and building an India he would be proud of. pic.twitter.com/axeQPnPHGN
Subhas Babu always took pride in India's history and our rich values.
— Narendra Modi (@narendramodi) October 21, 2018
He taught us that not everything must be seen from a non-Indian prism. pic.twitter.com/9qKPTILBWt
It is unfair that in the glorification of one family, the contribution of several other greats was deliberately forgotten.
— Narendra Modi (@narendramodi) October 21, 2018
It is high time more Indians know about the historic role of stalwarts Sardar Patel, Dr. Babasaheb Ambedkar and Netaji Subhas Bose. pic.twitter.com/t7G34trODe
It is our Government's honour that we have taken several steps for the welfare of our armed forces, including for women serving in the forces. pic.twitter.com/Lgd6wARIW2
— Narendra Modi (@narendramodi) October 21, 2018