Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

आंतरराष्ट्रीय वेसाक दिन समारंभाच्या उद्घाटन सोहळ्यात पंतप्रधानांचे भाषण

आंतरराष्ट्रीय वेसाक दिन समारंभाच्या उद्घाटन सोहळ्यात पंतप्रधानांचे भाषण

आंतरराष्ट्रीय वेसाक दिन समारंभाच्या उद्घाटन सोहळ्यात पंतप्रधानांचे भाषण

आंतरराष्ट्रीय वेसाक दिन समारंभाच्या उद्घाटन सोहळ्यात पंतप्रधानांचे भाषण


पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी आज कोलंबो येथील बंदरनायके मेमोरियल इंटरनॅशनल कॉन्फरन्स हॉलमध्ये आंतरराष्ट्रीय वेसाक दिन समारंभाच्या उद्घाटन सोहळ्याला संबोधित केले.

 पंतप्रधानांचे आगमन होताच श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष मैत्रीपाल सिरीसेना आणि पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी त्यांचे स्वागत केले.  पारंपारिक ढोलवादक आणि नर्तकांच्या ताफ्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वागत केले. त्यानंतर पंतप्रधानांनी सभागृहाच्या प्रवेशद्वाराजवळ समारंभाच्या प्रारंभी दीपप्रज्वलन केले.

 पाच बौद्ध नियमांच्या सादरीकरणाने समारंभाचा शुभारंभ झाला. बुध्द शासन आणि न्याय मंत्री श्री विजेयदास राजपक्षे यांनी यावेळी स्वागतपर भाषण केले.

 श्री लंकेतील आम्हा सर्वांसाठी आपण आमच्यापैकी एक आहात, असे त्यांनी नरेंद्र मोदी यांना संबोधित करताना सांगितले.

 पंतप्रधान नरेंद्र मोदी आज या ठिकाणी उपस्थित असणे ही आपल्यासाठी सुदैवाची बाब आहे, असे श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष मैत्रीपाल सिरीसेना यांनी यावेळी सांगितले. दोन्ही देशांमध्ये प्राचिन काळापासून कायम असलेल्या बंधांच्या स्मृतीला त्यांनी उजाळा दिला तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आजच्या वेसाक दिवस कार्यक्रमाला उपस्थित असणे हे उल्लेखनीय असून संपूर्ण जग या गोष्टीची दखल घेईल, असे ते म्हणाले. पंतप्रधान मैत्री आणि शांततेचा संदेश घेऊन आले आहेत, असेही ते म्हणाले.

 वेसाकहा सर्वात पवित्र दिवस असून या दिवसांमध्ये माणुसकी भगवान बुद्धांचा जन्म, आत्मज्ञान आणि परिनिर्वाणाचा सन्मान करते, असे पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात सांगितले. हा दिवस सर्वोच्च सत्य आणि कालातीत धम्माची प्रासंगिकता परावर्तित करण्याचा  आणि चार महान सत्यांचा दिवस आहे, असेही ते म्हणाले.

 कोलंबोमध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय वेसाक दिवसाच्या सोहळ्याचे मुख्य अतिथी म्हणून आमंत्रित केल्याबद्दल पंतप्रधानांनी राष्ट्राध्यक्ष मैत्रिपाल सिरीसेना, पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे आणि श्रीलंकेच्या जनतेचे आभार मानले.

 “आजच्या या शुभ प्रसंगी मी स्वत:बरोबरच आत्मभान प्राप्त झालेल्या सम्यक – संबुध्दयाच्या, 1.25 अब्ज लोकांच्या शुभेच्छा घेऊन आलो आहे.” असे पंतप्रधान म्हणाले.

 पंतप्रधानांच्या भाषणातील काही महत्वपूर्ण मुद्दे खालीलप्रमाणे :-

 भारतातील बोधगया, जिथे राजकुमार सिद्धार्थ बुद्ध झाला, ते बौद्ध धर्मीयांचे पवित्र केंद्र आहे.

 भगवान बुद्धांनी वाराणसी येथे पहिला धर्मोपदेश केला, त्याच ठिकाणचे संसदेत प्रतिनिधित्व करण्याचा सन्मान मला प्राप्त झाला आणि धम्म चक्र वेगाने धावू लागले.

 आमच्या प्रमुख राष्ट्रीय चिन्हांनी बौद्ध धर्माकडून प्रेरणा घेतली आहे.

 बौद्ध धर्म आणि त्याच्या विविध शाखा आमचे शासन, संस्कृती आणि तत्त्वज्ञानात खोलवर रूजल्या आहेत.

 बौद्ध धर्माचा दैवी सुगंध भारतातूनच जगाच्या कानाकोपऱ्यात दरवळला.

 धम्माच्या सर्वात मोठ्या देणगीचा प्रसार करण्यासाठी राजा अशोकाच्या महिंद्र आणि संघमित्रा या पात्र मुलांनी भारतापासून श्रीलंकेपर्यंतचा प्रवास केला.

 आजघडीला बौद्ध धर्माची शिकवण आणि दीक्षा देणाऱ्या सर्वात महत्त्वाच्या केंद्रांपैकी एक असल्याचे श्रीलंका अभिमानाने सांगते.

 अनेक शतकांनंतर अनागारीका धर्मपाल यांनीही याच प्रवासाला सुरूवात केली, मात्र यावेळी स्वतःच्या मूळ भूमीत बुद्धांच्या शक्तीला पुनरुज्जीवित करण्यासाठी ते श्रीलंकेहून भारतात आले.

 त्याच प्रकारे आपण आम्हाला आपल्या स्वतःच्या मुळांपर्यंत परत आणले.

 बौद्ध धर्मातील काही महत्वाच्या घटकांचे संरक्षण केल्याबद्दल जग श्रीलंकेप्रती ऋणी आहे.

 बौद्ध धर्माचा हा अविभाज्य वारसा जपण्यासाठी वेसाक हे आमच्यासाठी एक निमित्त आहे.

 हा असा वारसा आहे, जो आमच्या समाजाला पिढ्यानुपिढ्या आणि शतकानुशतके जोडणारा आहे.

 जगन्नीयंत्यानेच भारत आणि श्रीलंका यांच्यातील ही मैत्री योग्य वेळी घडवून आणली.

 बौद्ध धर्म आपल्या नातेसंबंधांना कायम एक तेज प्रदान करतो.

 निकटचे शेजारी म्हणून आमच्यातील नातेसंबंधांना अनेक स्तर आहेत.

 आमच्यातील बौद्ध धर्माच्या आंतरिक मूल्यांबरोबरच भविष्यातील आमच्या सामायिक अमर्याद शक्यतांपासून आम्हाला ही ऊर्जा प्राप्त होते.

 आमच्यातील मैत्री आमच्या नागरिकांच्या अंत:करणात आणि आमचे बंध आमच्या समाजाच्या घट्ट बांधणीत गुंफलेली आहे.

 बौद्ध परंपरेशी असलेले आमचे दुवे अधिक दृढ करण्यासाठी आणि त्यांना सन्मान प्रदान करण्यासाठी येत्या ऑगस्ट महिन्यापासून एअर इंडियातर्फे कोलंबो आणि वाराणसी दरम्यान थेट विमान उड्डाणे सुरू होतील, अशी घोषणा करताना मला अतिशय आनंद होतो आहे.

 यामुळे श्रीलंकेतील माझ्या बंधु आणि भगिनींना बुद्धाच्या देशात प्रवास करणे सोपे होईल आणि श्रावस्ती, कुशीनगर, संकसा, कौशंबी आणि सारनाथला भेट देणेही शक्य होईल.

 माझ्या तमीळ बंधु आणि भगिनींना काशी विश्वनाथाची भूमी असणाऱ्या वाराणसीला भेट देता येईल.

 श्रीलंकेशी आमच्या संबंधांबांबत आता आमच्यासमोर मोठ्या संधीचा क्षण उभा ठाकला आहे, असा विश्वास मला वाटतो आहे.

 विविध क्षेत्रांमध्ये आपल्या भागिदारीने मोठी झेप साध्य करण्याची ही संधी आहे. 

 आणि आपली प्रगती आणि यश हा आपल्यातील मैत्रीची यशस्विता निश्चित करण्याचा सर्वात योग्य मानदंड आहे. 

 श्रीलंकेतील बंधु आणि भगिनींच्या आर्थिक समृद्धीप्रती आम्ही वचनबद्ध आहोत.

 आमच्यातील विकासविषयक सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी, सकारात्मक बदल घडविण्यासाठी आणि आर्थिक वृद्धी साध्य करण्यासाठी आमची गुंतवणूक आम्ही कायम ठेवू.

 

आमचे ज्ञान, क्षमता आणि समृद्धीची देवाणघेवाण करण्यातच आमचे सामर्थ्य सामावलेले आहे.

 

व्यापार आणि गुंतवणूक क्षेत्रात आम्ही उत्तम भागिदार आहोत.

 

आमच्या सीमांदरम्यान व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान आणि संकल्पनांची मुक्त देवाण घेवाण दोन्ही पक्षांसाठी लाभदायक ठरेल, असा आम्हाला विश्वास वाटतो.

 

भारताचा वेगवान विकास संपूर्ण क्षेत्रासाठी, विशेषत: श्रीलंकेसाठीही फलदायक ठरेल.

 

पायाभूत सुविधा आणि जोडणी, वाहतूक आणि ऊर्जा या क्षेत्रांमध्ये आम्ही आमचे सहकार्य वाढविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

 

शेती, शिक्षण, आरोग्यपुनर्वसनवाहतूक, वीज, संस्कृती, पाणी, निवाराक्रीडा आणि मनुष्यबळ अशा मानवी आयुष्याशी निगडीत जवळपास प्रत्येक क्षेत्रात आमची विकासविषयक भागीदारी झाली आहे.

 

आज भारताचे श्रीलंकेशी असणारे विकास सहकार्य 2.6 अब्ज अमेरिकन डॉलरवर पोहोचले आहे.

 

आणि श्रीलंकेला आपल्या नागरिकांना शांततापूर्ण, समृद्ध आणि सुरक्षित भविष्य प्रदान करता यावे, हाच यामागचा उद्देश आहे.

 

कारण श्रीलंकेतील नागरिकांचे आर्थिक आणि सामाजिक स्वास्थ्य हे 1.25 अब्ज भारतीयांशी जोडले गेले आहे.

 

सुरक्षा, मग ती जमीनीवर असो किंवा हिंदी महासागरातील जल क्षेत्रातील असो, आमच्या समाजाची सुरक्षा ही अविभाज्य बाब आहे.

 

राष्ट्राध्यक्ष सिरीसेना आणि पंतप्रधान विक्रमसिंघे यांच्याशी  माझ्या संभाषणातही आमची सामाईक  उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हातमिळवणी करण्याच्या आमच्या इच्छेची पुनरावृत्ती झाली.

 

जेव्हा तुम्ही सुसंवाद साधण्यासाठी आणि आपल्या समाजाच्या प्रगतीसाठी महत्वाच्या पर्यायांची निवड कराल तेव्हा तुम्हाला राष्ट्र-उभारणीसाठी सहाय्य करणारा मित्र आणि भागीदार भारताच्या रूपात सापडेल.

 

भगवान गौतम बुद्धाने अडीच हजार वर्षांपूर्वी दिलेला संदेश आज एकविसाव्या शतकाशीही सुसंगत असा आहे.

 

बुद्धाने दर्शविलेला मध्यम मार्ग आपल्या सर्वांशीच संवाद साधतो.

 

त्याची विश्वाव्यापकता आणि कालातीत स्वरूप निश्चितच मार्गदर्शक आहे.

 

ती सर्व राष्ट्रांना एकत्र आणणारी शक्ती आहे.

 

दक्षिण, मध्य, आग्नेय आणि पूर्व आशियातील देशांनाही बुद्धाच्या भूमीशी असलेल्या आपल्या दुव्यांचा सार्थ अभिमान आहे. 

 

वेसाक दिन साजरा करण्यासाठी निवडलेली सामाजिक न्याय आणि शाश्वत जागतिक शांततेची संकल्पना ही बुद्धाच्या शिकवणीशी सुसंगत अशीच आहे.

 

या संकल्पना स्वतंत्र वाटू शकतात.

 

मात्र त्या सखोलपणे स्वतंत्र तरी एकमेकांशी जोडलेल्या आहेत.

 

सामाजिक न्यायाचा मुद्दा हा अंतर्गत आणि समुदायांतर्गत विरोधाभासाशी निगडीत आहे.

 

याचा उगम प्रामुख्याने संस्कृत भाषेतील तान्हा किंवा तृष्णा म्हणजेच तहान अर्थात अतिलोभातून होतो.

 

लोभामुळे मानवाने आमच्या नैसर्गिक आवासावर वर्चस्व प्राप्त करीत त्याचा विध्वंसही केला.

 

सर्व काही प्राप्त करण्याच्या आमच्या लोभामुळे समुदायात असमान उत्पन्नगट तयार झाले आणि त्यामुळे सामाजिक सुसंवाद धोक्यात आला.

 

त्याचप्रमाणे आजघडीला राष्ट्रा-राष्ट्रातील वाद हे शाश्वत वैश्विक शांतता प्राप्त करण्यातले सर्वात मोठे अपरिहार्य आव्हान नाही.

 

द्वेष आणि हिंसेच्या संकल्पनांच्या मूळाशी असणारी वृत्ती, विचारप्रवाह, घटक आणि साधने हे त्यामागचे खरे कारण आहे.

 

आमच्या प्रदेशातील दहशतवादाचा धोका हे या विध्वंसक भावनांचे एक मोठे प्रकटीकरण आहे.

 

दुःखाची गोष्ट म्हणजे तिरस्काराची बीजे रूजविणारी ही विचारसरणी आणि त्यांचे प्रचारक हे संवादासाठी खुले नाहीत आणि त्यामुळे केवळ मृत्यू आणि विनाशच उद्‌भवतो आहे.

 

जगभरातील वाढत्या हिंसेला बुद्धाच्या शांततेच्या संदेशानेच उत्तर देता येईल, असा विश्वास मला वाटतो.

 

आणि संघर्ष नसणे म्हणजे शांतता असणे नाही, हे सुद्धा तितकेच खरे आहे.

 

जेथे करुणा (अनुकंपा) आणि प्रज्ञेवर (ज्ञान) आधारित संवादसुसंवाद आणि न्यायाला प्रोत्साहन देण्यासाठी सगळे प्रयत्नशील असतात,तेथेच खरी शांतता नांदते. 

 

बुद्धांनी म्हटल्याप्रमाणे, “शांतीपेक्षा मोठा अधिक आनंद नाही”

 

वेसाक निमित्त भारत आणि श्रीलंका हे दोन्ही देश आपल्या सरकारी धोरणात आणि वर्तनात शांतता, स्वीकार, समावेशकता आणि अनुकंपा या मूल्यांना प्रोत्साहन देत आणि भगवान बुद्धांच्या आदर्शांचे समर्थन करीत एकत्र काम करतील, अशी आशा मला वाटते.

 

लोभ, तिरस्कार आणि अज्ञान या तीन विषाक्त गुणांपासून व्यक्ती, कुटुंबेसमाजराष्ट्रे आणि जगाला मुक्त करण्यासाठी हाच खरा मार्ग आहे.

 

वेसाकच्या पवित्र दिवशी अंधारातून बाहेर पडण्यासाठी आपण ज्ञानाचे दिवे तेजाळूया, अधिक आत्मपरिक्षण करू या आणि केवळ सत्याची कास धरू या.

 

आणि ज्यांच्या प्रकाशाने अवघे विश्व प्रकाशित होत आहे अशा बुद्धाच्या मार्गांचे अनुसरण करण्याप्रती आपले प्रयत्न समर्पित करूया.

 

धम्मपदाच्या 387 व्या श्लोकात नमूद केल्याप्रमाणे:

 

सूर्यप्रकाश दिवसा प्रकाश देतो,

 

चंद्रप्रकाश रात्री उजळतो,

 

योद्धा त्याच्या चिलखतामध्ये तळपतो.

 

ब्राह्मण त्याच्या ध्यानधारणेमध्ये उजळतो

 

मात्र ज्याचा आत्मा जागृत झाला, तो स्वत:च्या तेजाने सर्व दिवस रात्र तळपतो.

 

आपल्यासह या समारंभात सहभागी होण्याचा सन्मान दिल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद.

 

मी आज दुपारी कॅंडी येथे श्रीदाल्दा मालिगावा पवित्र दोंगा अवशेष मंदिरात आदरांजली वाहण्यास उत्सुक आहे. बुद्ध, धम्म आणि  संघ या तीन्ही रत्नांची कृपादृष्टी आपल्याला सदैव लाभावी, हीच सदिच्छा.

 

B.Gokhale/M.Pange/Anagha