Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाडमध्ये भारताने केलेल्या  सर्वोत्तम कामगिरीची पंतप्रधानांनी केली प्रशंसा


आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाडमध्ये, चौथे स्थान मिळवत भारताने केलेल्या सर्वोत्तम कामगिरीबद्दल पंतप्रधान, नरेंद्र मोदी यांनी अतिशय आनंद आणि अभिमान व्यक्त केला आहे.

भारतीय खेळाडूंच्या चमूने चार सुवर्ण आणि एक रौप्य पदक पटकावले आहे.

आपल्या  X पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणाले;

आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाडमधील सर्वोत्तम कामगिरी दर्शवित भारत चौथ्या क्रमांकावर आला आहे ही अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बाब आहेआमच्या चमूने 4 सुवर्ण आणि एक रौप्य पदक पटकावले  आहे. या कामगिरीमुळे इतर अनेक तरुणांना प्रेरणा मिळेल आणि गणित अधिक लोकप्रिय होण्यास मदत होईल.”

***

N.Chitale/S.Patgoankar/P.Kor