Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

अहमदाबादमध्ये नवरात्रोत्सव सोहळ्यात पंतप्रधान सहभागी

अहमदाबादमध्ये नवरात्रोत्सव सोहळ्यात पंतप्रधान सहभागी


नवी दिल्‍ली, 29 सप्‍टेंबर 2022 

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री अहमदाबाद इथल्या जीएमडीसी मैदानावर नवरात्र उत्सवानिमित्त  झालेल्या  कार्यक्रमाला उपस्थित होते.

गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत आणि गुजरातचे मुख्यमंत्री  भूपेंद्र पटेल यांच्यासमवेत पंतप्रधानांचे कार्यक्रमस्थळी आगमन झाले. पंतप्रधानांनी कार्यक्रमस्थळी राज्यपाल आणि मुख्यमंत्री आणि लाखो भाविकांसह अंबामातेची  महाआरती केली. भारतीय संस्कृतीचे प्रतीक असलेल्या आणि गुजरातच्या स्थानिक वैशिष्ठ्यांचे दर्शन घडवणाऱ्या  नवरात्र उत्सवात पंतप्रधान सहभागी झाल्यामुळे या शुभ प्रसंगी भाविकांचा आनंद द्विगुणित झाला. मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना ‘माँ अंबाजी श्री यंत्र’ शुभ स्मृतिचिन्ह दिले. पंतप्रधानांनी सांस्कृतिक कार्यक्रम आणि गरबाही  पाहिला.

पंतप्रधान दोन दिवसांच्या  गुजरात दौऱ्यावर असून त्यांनी  आज सुरत आणि भावनगर येथील कार्यक्रमांत  उद्घाटन/लोकार्पण /शिलान्यास केला.  त्यांनी आज अहमदाबादमध्ये राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा  2022 सुरू झाल्याचे घोषित केले. .

पंतप्रधान उद्या 51 शक्तीपीठांपैकी एक असलेलले श्रद्धास्थान अंबाजी,येथे जाणार आहेत.  अंबाजी येथे 7200 कोटी रुपये किमतीच्या विविध विकास प्रकल्पांची  पायाभरणी आणि राष्ट्रार्पण पंतप्रधान करतील.   पंतप्रधान आवास योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या 45,000 घरांचे लोकार्पण आणि पायाभरणी पंतप्रधान करतील. तरंगा हिल (टेकडी) – अंबाजी – आबू रोड नवीन ब्रॉडगेज मार्गाची आणि प्रसाद योजनेंतर्गत अंबाजी मंदिरातील तीर्थक्षेत्र सुविधांच्या  विकासाची  पायाभरणी पंतप्रधान करणार आहेत. 51 शक्तीपीठांपैकी एक असलेल्या अंबाजीला भेट देणाऱ्या लाखो भाविकांना नवीन रेल्वे मार्गामुळे फायदा होईल आणि या सर्व तीर्थक्षेत्रांना भेट देणाऱ्या  भक्तांचा उपासना अनुभव समृद्ध होईल.  पायाभरणी करण्यात येणाऱ्या इतर प्रकल्पांमध्ये दीसा येथील हवाईदल तळाशी संबंधित पायाभूत सुविधा आणि धावपट्टीचे बांधकाम, अंबाजी बायपास रोड यांचा समावेश आहे.

मालवाहतुकीला समर्पित पश्चिम  कॉरिडॉरच्या  62 किलोमीटर लांबीचे  न्यू पालनपूर-न्यू महेसाणा पट्टा   आणि 13 किलोमीटर लांबीचा   न्यू पालनपूर-नवी चातोदार पट्टा   (पालनपूर बायपास लाइन) यांचे लोकार्पण पंतप्रधान करतील. यामुळे पिपावाव, दीनदयाळ  बंदर प्राधिकरण (कांडला), मुंद्रा आणि गुजरातच्या इतर बंदरांशी कनेक्टिव्हिटी वाढेल.  हे मार्ग सुरू झाल्यावर  734 किमी लांबीचे  मालवाहतुकीला समर्पित  पश्चिम  कॉरिडॉर  कार्यान्वित होईल. हा पट्टा  सुरू झाल्याने गुजरातमधील मेहसाणा-पालनपूरमधील, राजस्थानमधील स्वरूपगंज, केशवगंज, किशनगड; हरियाणातील रेवाडी-मानेसर आणि नारनौल इथल्या उद्योगांना फायदा होईल.  मिठा-थराड-दीसा रस्त्याच्या रुंदीकरणासह विविध रस्ते प्रकल्पांचे पंतप्रधान लोकार्पण करतील.

* * *

S.Kane/S.Kakade/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai