Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

अहमदाबादमधील बावला-बगोदरा महामार्गावर झालेल्या अपघातातल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त


नवी दिल्ली, 11 ऑगस्ट 2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील, अहमदाबाद येथील बावला-बगोदरा महामार्गावर झालेल्या अपघातातल्या जीवितहानीबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

पंतप्रधानांनी, पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधी मधून (PMNR) मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 2 लाख तर जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे.

पंतप्रधान कार्यालयाने ट्विट केले;

अहमदाबाद जिल्ह्यातील बावला-बगोदरा महामार्गावरील रस्ते अपघातामुळे तीव्र दुःख झाले. या अपघातातल्या शोकाकुल कुटुंबीयांसमवेत माझ्या संवेदना आणि जखमी व्यक्ती लवकर बऱ्या होवोत अशी प्रार्थना करतो. स्थानिक प्रशासन बाधितांना सर्वतोपरी मदत करत आहे.

 

 

S.Patil/V.Yadav/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai