जय हिंद!
जय हिंद!
जय हिंद!
अरुणाचल प्रदेश, मणिपुर, मेघालय, नागालैंड, सिक्किम आणि त्रिपुराचे राज्यपाल महोदय आणि मुख्यमंत्री गण, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी, राज्यांमधील मंत्रीगण, संसदेतील सहकारी, सर्व उपस्थित आमदार, इतर उपस्थित लोकप्रतिनिधी आणि या सर्व राज्यांमधील माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो!
संपूर्ण देशामध्ये विकसित राज्य, विकसित राज्यांच्या माध्यमातून विकसित भारत, याबाबतीतला एक राष्ट्रीय उत्सव सर्वत्र मोठ्या वेगाने साजरा होतो आहे. आज मला विकसित नॉर्थ ईस्ट अर्थात ईशान्य प्रदेशांच्या या उत्सवांमध्ये ईशान्यकडच्या सर्व राज्यांच्या बरोबर एकाच वेळेस सहभागी होण्याची संधी प्राप्त झालेली आहे.
आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने इथे आलेले आहात. मणिपुर, मेघालय, नागालैंड, सिक्किम आणि त्रिपुरा या राज्यांमधून सुद्धा हजारोंच्या संख्येने लोकं, तंत्रज्ञानाच्या (दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून) माध्यमातून या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. विकसित ईशान्य प्रदेशाचा संकल्प घेण्यासाठी मी आपल्या सर्वांचे हृदयापासून खूप खूप अभिनंदन करत आहे.मी अरुणाचल प्रदेशामध्ये अनेक वेळेला आलेलो आहे, परंतु मला आज काहीतरी वेगळेच पाहायला मिळत आहे.आणि यामध्ये सुद्धा माता भगिनींची संख्या अद्भुत आहे, अगदी अद्भुत वातावरण आहे आज.
मित्रांनो,
ईशान्य प्रदेशाच्या विकासासाठी आमचा दृष्टिकोन अष्टलक्ष्मी चा राहिला आहे.दक्षिण एशिया आणि पूर्व एशियाच्या बरोबर भारताचा कल, पर्यटन आणि दुसऱ्या इतर संबंधांबाबत एक मजबूत दुवा ठरणार आहे आणि अशाच तऱ्हेने आमचा ईशान्येकडील प्रदेशाचा विकास साधला जाणार आहे.
आज सुद्धा इथे एकाच वेळेला फिफ्टी फाईव्ह करोड रुपये 55 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या प्रकल्पांचे लोकार्पण अथवा पायाभरणी झालेली आहे. आज अरुणाचल प्रदेशासाठी 35 हजार गरीब कुटुंबांना आपले पक्के घर मिळालेले आहे.
अरुणाचल प्रदेश आणि त्रिपुरा मधील हजारो कुटुंबांना नळांच्या जोडण्या मिळालेल्या आहेत.ईशान्य प्रदेशांशी संबंधित वेगवेगळ्या राज्यांमधील कनेक्टिव्हिटी अर्थात दळणवळणासंबंधी अनेक प्रकल्पांचे पायाभरणी आणि लोकार्पण होत आहे.वीज, पाणी, रस्ते, रेल्वे, शाळा, रुग्णालय, पर्यटन अशा अनेक विकासाच्या या पायाभूत सुविधा, ईशान्येकडील प्रत्येक राज्यांना विकसित बनवण्याची गॅरंटी (हमी) घेऊन आलेले आहेत.
ईशान्येकडील प्रदेशांच्या विकासासाठी आम्ही जेवढी गुंतवणूक मागच्या 5 वर्षांमध्ये केलेली आहे, म्हणजेच पूर्वी जी काँग्रेस अथवा मागची सरकारे करत होती त्यापेक्षा जवळजवळ 4 पटीने, 4 वेळा अधिक.याचाच अर्थ असा होतो की, आम्ही जी कामे 5 वर्षात केली, जेवढी गुंतवणूक 5 वर्षांमध्ये केली, तेवढेच काम करण्यासाठी काँग्रेसला 20 वर्षे लागली असती. का आपण 20 वर्षापर्यंत वाट बघू शकला असतात का? 20 वर्ष वाट बघू शकला असता? ही कामे लवकरात लवकर व्हायला हवीत की नाही व्हायला हवी होती. मोदी करत आहे की नाही करत आहे, आपण आनंदी आहात ना.
मित्रांनो,
ईशान्य कडील प्रदेशावर लक्ष केंद्रित करून आमच्या सरकारने विशेषत्वाने मिशन पाम ऑइल (पाम तेल) ची सुरुवात केली होती.आज याच मिशनच्या माध्यमातून पहिल्या तेल कारखान्याचे लोकार्पण झालेले आहे. हे मिशन भारताला खाद्य तेलाच्या क्षेत्रात (एडीबल ऑइल) च्या संबंधी क्षेत्रात आत्मनिर्भर तर बनवेल परंतु यामुळे येथील शेतकऱ्यांची मिळकत सुद्धा वाढणार आहे. आणि मी आभारी आहे ईशान्य कडील प्रदेशातील शेतकऱ्यांचा याचे कारण की हे मिशन सुरू झाल्यानंतर खूप मोठ्या संख्येने आमचे शेतकरी बंधू-भगिनी पाम झाडाची शेती करण्यासाठी पुढे आले आहेत. जे काम एका खूप मोठ्या उज्वल भविष्यासाठी होत आहे.
मित्रांनो,
मोदींची गॅरंटी (हमी), मोदींची गॅरंटी याबाबत तर आपण लोकांनी ऐकलेच असेल, परंतु मोदींच्या गारंटीचा अर्थ काय असतो हे जरा अरुणाचल मध्ये, एवढ्या दूर- दुर्गम भागात येऊन पहावे. आपल्याला त्याची प्रत्यक्ष अनुभूती होईल. संपूर्ण ईशान्य प्रदेश पाहत आहे की मोदींची गॅरंटी कशाप्रकारे काम करत आहे.आता बघा, 2019 मध्येच मी सेला बोगद्याची पायाभरणी करण्याचे काम केले होते.आपल्याला आठवत असेल ना 2019 मध्ये..आणि आज काय झाले बोगदा बनला की नाही, बनला बनला की नाही बनला, काय याला गॅरंटी म्हणतात की नाही म्हणत, ही पक्की गॅरंटी आहे की नाही आहे. पहा 2019 मध्येच मी डोनी पोलो विमानतळाची सुद्धा पायाभरणी केलेली होती.आज हे विमानतळ खूप चांगल्या प्रकारे सुविधा प्रदान करत आहे, की नाही करत आहे.
आता सांगा… मी 2019 मध्ये ही पायाभरणी केली होती ना तेव्हा काही लोकांना वाटत होते की मोदीं तर हे सर्व निवडणुकांसाठी करत आहेत. आता तुम्हीच सांगा मी हे सर्व काही निवडणुकांसाठी केलेले होते की आपल्यासाठी केलेले होते. मी हे सर्व काही अरुणाचल प्रदेशसाठी केलेले होते, की नव्हते केले, वेळ कोणतीही असो, वर्ष कोणतेही असो, महिना कोणताही असो, माझे काम केवळ आणि केवळ देशवासीयांसाठी होत असते.जनता जनार्दनासाठी होत असते आपल्या सर्वांसाठी होत असते.
आणि मोदींची अशी हमी जेव्हा पूर्ण होत असते..तेव्हा नॉर्थ ईस्ट चा कोना कोना सुद्धा हेच म्हणत असतो, इथल्या डोंगर रांगांमधून सुद्धा हाच आवाज सतत ऐकायला मिळतो, इथल्या नद्यांच्या झुळझुळाटामधून सुद्धा हे शब्द एकाला मिळतात, आणि एकच आवाज ऐकू येतो…आणि काय संपूर्ण देशाने ऐकले आहे…अबकी बार-400 पार!, यावेळेस 400 पार, एनडीए सरकार 400 पार, अबकी बार-400 पार!, संपूर्ण ताकदीने बोला, संपूर्ण नॉर्थ ईस्ट प्रदेशाला ऐकायला गेले पाहिजे, अबकी बार मोदी सरकार! अबकी बार मोदी सरकार!
मित्रांनो,
दोन दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने ईशान्यकडील प्रदेशाच्या औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी उन्नती योजनेला एक नवीन स्वरूप दिले आहे आणि त्या योजनेचा आवाका वाढवून त्या योजनेला मंजुरी दिलेली आहे. त्या संदर्भात आपण एक छोटा माहितीपट सुद्धा पाहिला आहे. आणि त्यामधून आपण सर्वांनी आमच्या सरकारची कार्यशैली सुद्धा पाहिली. एकाच दिवसांमध्ये अधिसूचना जारी करण्यात आली आणि त्या संदर्भात नियमावली सुद्धा बनून तयार आहे.
आणि आज मी आपल्यासमोर येऊन आपल्या सर्वांना उन्नती योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करत आहे. हे सर्व काही 40-50 तासांच्या कालावधीमध्येच घडत आहे.
मागच्या 10 वर्षांमध्ये आम्ही इथे अत्याधुनिक पायाभूत सुविधांचा विस्तार केला. जवळजवळ एक डझन शांती करार लागू केले, आम्ही अनेक सीमावादांवर तोडगा काढला. आता विकासाचे पुढचे पाऊल म्हणजे ईशान्येकडील प्रदेशामध्ये औद्योगीकरणाचा विस्तार करणे हा आहे. 10 हजार कोटी रुपये खर्चाची उन्नती योजना नॉर्थ ईस्ट प्रदेशामध्ये गुंतवणूक आणि रोजगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध करून देईल. या योजनेमुळे इथे मॅन्युफॅक्चरिंग अर्थात उत्पादन निर्मिती साठी नव- नवीन क्षेत्रे आणि सेवांशी निगडित नवीन उद्योग उभारण्यासाठी सरकार मदत करणार आहे.
माझा पूर्ण भर या गोष्टीवर राहिलेला आहे की, यावेळेस यामधून स्टार्टअप्स, नवीन तंत्रज्ञान, होम स्टे, पर्यटन अशा अनेक क्षेत्रांमध्ये ज्यामध्ये आपले तरुण येऊ इच्छित आहेत मी त्या सर्व तरुणांना संपूर्ण पाठिंबा देण्याची हमी देत आहे. मी नॉर्थ ईस्ट मधील सर्व राज्यांच्या तरुणांना रोजगाराच्या नवनवीन संधी देणाऱ्या या योजनेसाठी अनेक अनेक शुभकामना आणि शुभेच्छा देत आहे.
मित्रांनो,
ईशान्य प्रदेशांमधील महिलांचे जीवन सुखकर व्हावे त्यांना नवनवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात हीच बीजेपी सरकारचची प्राथमिकता राहिलेली आहे. ईशान्य प्रदेशांमधील भगिनींना मदत करण्यासाठी काल आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या दिवशी आमच्या सरकारने गॅस सिलेंडरचे भाव शंभर रुपयांनी आणखीन कमी केलेले आहेत.
नॉर्थ ईस्ट भागामध्ये प्रत्येक घराघरांमध्ये नळाद्वारे पाणी पोहोचवण्याचे काम सुद्धा खूपच यशस्वीपणे सुरू आहे आणि यासाठी मी मुख्यमंत्रीजी, यांना आणि त्यांच्या संपूर्ण चमुला खूप खूप शुभेच्छा देतो आहे. आणि आपण अनुभव घेत असाल की, आज विकास कार्यांमध्ये नॉर्थ ईस्ट, आपला अरुणाचल प्रदेश संपूर्ण देशामध्ये प्रथम क्रमांकावर राहिलेला आहे. आता तुम्हीच सांगा यापूर्वी तर असे समजले जायचे की, मित्रा इथे तर सर्व काही सर्वात शेवटी होणार आहे. परंतु आज ज्याप्रमाणे सूर्याचे पहिले किरण येथे पोहोचते त्याचप्रमाणे विकासाची कामे सुद्धा सर्वात आधी इथे होत आहेत जी. आज इथे अरुणाचल प्रदेशामध्ये 45 हजार कुटुंबांपर्यंत पिण्याचे पाणी पोचवण्यासाठीच्या प्रकल्पाचे लोकार्पण झालेले आहे. अमृत सरोवर अभियानाच्या माध्यमातून सुद्धा इथे अनेक सरोवर निर्माण करण्यात आलेले आहेत.
आमच्या सरकारने गावातील भगिनींना लखपती दिदी करण्यासाठी एक मोठी मोहीम सुरु केली आहे. या अंतर्गत स्वयंसहाय्यता समूहाच्या हजारो भागिनी लखपती दिदी झाल्या आहेत. आता आमचे उद्दिष्ट आहे ते देशातील तीन कोटी बहिणींना लखपती दीदी करण्याचे. ईशान्येच्या महिलांना ईशान्येच्या भगिनींना, लेकींना याचा मोठा फायदा होणार आहे.
मित्र हो,
भाजपा सरकार हे प्रयत्न करत असताना काँग्रेस आणि इंडी आघाडी काय करत आहेत? ही माणसं काय करत आहेत ते आपणा सर्वांना व्यवस्थित माहिती आहे. गेल्या काळात जेव्हा आपल्या सीमांवर यांनी आधुनिक पायाभूत सुविधा उभा करायला हव्या होत्या तेव्हा काँग्रेसची सरकारे घोटाळे करण्यात दंग होती. आपल्या सीमेला, आपल्या सीमेवरील गावांना अविकसित ठेवून काँग्रेस देशाच्या सुरक्षेशी खेळ करत होती. आपल्याच लष्कराला कमकुवत ठेवणे, आपल्याच लोकांना सुविधा आणि समृद्धी यापासून वंचित ठेवणे हीच काँग्रेसच्या कामकाजाची पद्धत आहे. हेच त्यांचे तत्त्व आहे, हीच त्यांची रीत आहे.
मित्रहो,
सेवा बोगदा याआधीही तयार होणे शक्य होते, शक्य होते की नाही? पण काँग्रेसची विचारसरणी आणि प्राधान्यक्रम काही वेगळे होते. त्यांना वाटत होते संसदेत एक दोन जागा तर आहेत. इतके पैसे का खर्च करायचे? मोदी संसदेतील सदस्यांचे मोजदाद करून काम करत नाही. देशाच्या आवश्यकता लक्षात घेऊन काम करतात. केंद्रातल्या मजबूत आणि राष्ट्रहिताला प्राधान्य देणाऱ्या सरकारने 13000 फुटांच्या उंचीवर तयार केलेलै हे टनेल बघण्यासाठी यावे असे मी देशातल्या युवकांना सांगेन.
इथे आपल्याकडे कसे काम होते आहे ते बघण्यासाठी तेरा हजार फुटांच्या उंचीवर हे शानदार टनेल तयार केले आहे. आणि मी सेलातील बंधू-भगिनींना हे सांगू इच्छितो की आज हवामानामुळे मी तेथे पोहोचू शकलेलो नाही पण मी आपल्याला वचन देतो की माझ्या तिसऱ्या कार्यकाळात मी इथे जरूर येईन आणि आपल्याला भेटेल या टनेलमुळे तवांमध्ये आपल्या लोकांना सर्व प्रकारच्या हवामानात कनेक्टिव्हिटी मिळत आहे. स्थानिक लोकांसाठी येणे जाणे आणि वाहतूक सुलभ झाले आहे. यामुळे पर्यटनाला अरुणाचल प्रदेशात वाव मिळेल. या संपूर्ण भागात अनेक टनेल्सवर आज वेगाने काम सुरू आहे.
मित्रहो,
काँग्रेसने सीमेवरच्या गावांना सुद्धा दुर्लक्षित ठेवले होते . देशातील शेवटची गावे म्हणत त्यांना त्यांच्या भरोशावर सोडून दिले होते. आम्ही या गावांना शेवटची गावे म्हणत नाही, माझ्या दृष्टीने तर ही देशातील पहिली गावे आहेत, फर्स्ट व्हिलेज आणि आम्ही यांना पहिली गावे मानत व्रायब्रंट व्हिलेज कार्यक्रम सुरू केला होता. आज इथे जवळपास सीमेवरच्या सव्वाशे गावांसाठी रस्त्यांच्या प्रकल्पांची कामे सुरू झाली आहेत आणि दीडशेपेक्षा अधिक गावांमध्ये रोजगारांची, पर्यटनाशी संबंधित प्रकल्पांचे भूमिपूजन झाले आहे. आदिवासींमध्ये सर्वात जास्त मागास असलेल्या ज्या जनजाती आहेत त्यांच्या विकासासाठी पहिल्यांदा आम्ही पीएम जनमन योजना आणली. आज मणिपूर मध्ये अशा जनजातींच्या वस्त्यांमध्ये अंगणवाडी केंद्रांचे भूमिपूजन झाले आहे. त्रिपुराच्या साबरुम लँड पोर्ट सुरू होण्यामुळे ईशान्येला एक नवीन वाहतूक मार्ग मिळेल व्यापार व्यवसाय अधिक सुलभ होईल.
मित्र हो,
कनेक्टीविटी आणि वीज या दोन गोष्टी अशा आहेत ज्यामुळे जीवन सुलभ होते आणि व्यापारउदीम सुद्धा सुलभ होतं. स्वातंत्र्यानंतर 2014 पर्यंत ईशान्येत हा आकडा लक्षात ठेवा , तर ईशान्येत दहा हजार किलोमीटर राष्ट्रीय महामार्ग बांधले गेले होते. म्हणजे सात दशकात म्हणजेच गेल्या दहा वर्षात फक्त दहा वर्षात सहा हजार किलोमीटर हुन अधिक राष्ट्रीय महामार्ग तयार झाले आहेत. गेल्या सात दशकात जेवढे काम झाले तेवढे मी एक जवळ जवळ एका दशकात करून दाखवले आहे.
2014 नंतर ईशान्येत जवळपास दोन हजार किलोमीटर नवीन रेल्वे मार्ग तयार झाले. विद्युत क्षेत्रात सुद्धा अबूतपूर्वकाम झाले आहे. अरुणाचलमध्ये आजच दिबांग मल्टीपर्पज हायड्रोपॉवर प्रोजेक्ट आणि त्रिपुरात एका सौरऊर्जेच्या प्रकल्पावर काम सुरू झाले आहे. दिबांग धरण हे देशातील सर्वात उंच धरण होणार आहे. म्हणजेच भारतातील सर्वात उंच पुलाबरोबरच आता सर्वात मोठं धरणही ईशान्येला मिळणार आहे.
मित्रहो,
मोती एका बाजूला विकसित भारताच्या निर्मळण्यासाठी एक एक वीट सोडून युवकांच्या उत्तम भविष्यासाठी दिवस रात्र काम करत आहे तिथे दुसऱ्या बाजूला मी दिवस-रात्र असं म्हणत होते तेव्हा माझ्याहून जास्त माणसे म्हणतात मोदीजी एवढे काम करू नका. आजच मी अरुणाचल प्रदेश, आसाम, बंगाल आणि उत्तर प्रदेश या चार राज्यात कार्यक्रम करणार आहे एका दिवसात. तर दुसऱ्या बाजूला काँग्रेसच्या इंडी आघाडीमधल्या घराणेशाहील्या नेत्यांनी हे काम मी करत असताना मोदीवरचे हल्ले वाढवले आहेत आणि अलीकडे लोक विचारू लागले आहेत की मोदीचा परिवार कोण? मोदीचा परिवार कोण आहे ? कोण आहे मोदीचा परिवार? तर नावे ठेवणाऱ्यांनो कान उघडे ठेवून ऐका अरुणाचलच्या डोंगरात राहणारा प्रत्येक परिवार म्हणतो की आम्ही मोदींचे कुटुंबीय आहोत. हे घराणे शाही वाले फक्त आपल्या कुटुंबाचाच फायदा बघतात. म्हणून तिथून मत मिळणार नाही तिथे हे लोक लक्ष देत नाहीत अनेक दशकांपर्यंत देशात घराणेशाहीची सरकारे आली तेव्हा ईशान्य भागाचा विकास झाला नाही.
ईशान्य भागातून संसदेत कमी सदस्य जातात म्हणून काँग्रेसच्या इंडी आघाडीला आपली पर्वा नाही की , आपली काळजी नाही, की आपल्या मुलांच्या भविष्याची ही काळजी नाही. यांना आपल्या मुलांची चिंता होती. ते आपल्या मुलांचेच भले करण्यात मग्न आहेत. तुमच्या मुलांचे भले झाले नाही तरी त्यांना काही पर्वा नाही. आपली मुले बाणे कोणत्या परिस्थितीत आहे त्याची परवा त्यांनी कधी केली नाही आणि करणारही नाहीत. परंतु मोदींसाठी प्रत्येक व्यक्ती मग तो अगदी लांब बसलेला असेल ,जंगलात राहणारा असेल अगदी डोंगरावर राहणारा असेल की लांब वरच्या छोट्या गावांमध्ये राहणार असेल प्रत्येक व्यक्ती प्रत्येक कुटुंब हे सर्व माझे कुटुंब आहे. जोपर्यंत प्रत्येक व्यक्तीपर्यंत पक्के घर, मोफत रेशन, पिण्याचे शुद्ध पाणी, वीज , संडास , गॅस कनेक्शन, मोफत औषध , उपचार , इंटरनेट कनेक्शन अशा सुविधा पोहोचत नाहीत तोपर्यंत मोदी आरामात बसू शकत नाही. आज हे जेव्हा मोदींचे कुटुंब या विषयावर प्रश्न करतात तेव्हा जणू माझे अरुणाचलचे बंधू भगिनी म्हणतात , संपूर्ण देश उत्तरतो प्रत्येक कुटुंब म्हणते की, आम्ही आहोत मोदींचे कुटुंब प्रत्येक कुटुंब म्हणते मी आहे मोदींचे कुटुंब मी आहे मोदीचे कुटुंब.
माझ्या कुटुंबीयांना,
आपले स्वप्न आहे जे आपले स्वप्न आहे ते आपले स्वप्न म्हणजे मोदींचा संकल्प आहे एवढ्या मोठ्या संख्येने आपण आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आलात पुन्हा एकदा आपल्या सर्वांना पूर्ण ईशान्य भागातील विकास कामांसाठी मी खूप शुभेच्छा देतो आणि या विकासाच्या उत्सवाच्या आनंदासाठी आलेले माझ्यासमोर असलेले हे सर्वजण या सर्वांना माझा आग्रह आहे की आपला मोबाईल फोन बाहेर काढा आणि आपल्या मोबाईल फोनचा फ्लॅश लाईट सुरु करा. सर्वजण आपल्या मोबाईलचा फ्लॅश लाईट सुरु करा सर्वजण मोबाईलचा फ्लॅश लाईट सुरु करा या सेला पनवेलच्या गौरवासाठी विकासाच्या गौरवासाठी चारही दिशांना बघा व कल दृश्य आहे शाब्बास. आपल्या देशाला शक्ती देण्याची ही सूचना आहे देशाला शक्ती देणारे दृश्य सर्व आपला मोबाईल फोन काढून आपल्या मोबाईलचा फ्लॅश लाईट सुरु करा आणि माझ्याबरोबर बोला भारत माता की जय फ्लॅश लाईट सुरू ठेवून म्हणा .
भारत माता की जय !
भारत माता की जय !
भारत माता की जय !
खूप खूप धन्यवाद !
***
H.Akude/V.Yadav/V.Sahajrao/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com /PIBMumbai /pibmumbai
We are committed to making the Northeast the growth engine of India. Addressing the 'Viksit Bharat Viksit Northeast' programme in Itanagar.https://t.co/dhHibYEwJG
— Narendra Modi (@narendramodi) March 9, 2024
Northeast is the 'Ashtalakshmi' of India. pic.twitter.com/xbARDbx3Br
— PMO India (@PMOIndia) March 9, 2024
Our government is committed to development of the Northeast. pic.twitter.com/Rpkbxuk3FS
— PMO India (@PMOIndia) March 9, 2024
UNNATI Yojana for encouraging development of industries in the Northeast. pic.twitter.com/4zbe3lOK8e
— PMO India (@PMOIndia) March 9, 2024