नवी दिल्ली , 6 जानेवारी 2025
अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हन यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
भारत-अमेरिका सर्वसमावेशक जागतिक धोरणात्मक भागीदारीमध्ये गेल्या चार वर्षांत, विशेषत: तंत्रज्ञान, संरक्षण, अंतराळ, नागरी आण्विक, स्वच्छ ऊर्जा, सेमीकंडक्टर्स आणि एआय म्हणजेच कृत्रिम प्रज्ञा या प्रमुख क्षेत्रांमध्ये झालेल्या महत्त्वपूर्ण प्रगतीचे उभय नेत्यांनी सकारात्मक मूल्यांकन केले.
राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्याबरोबर झालेल्या विविध बैठकांचे स्मरण यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. यामध्ये ‘क्वाड’ नेत्यांच्या शिखर परिषदेसाठी सप्टेंबर 2024 मध्ये केलेल्या अमेरिका दौऱ्याप्रसंगी झालेल्या भेटीला त्यांनी उजाळा दिला. भारत-अमेरिका व्यापक जागतिक धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्यासाठी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्या योगदानाचे पंतप्रधानांनी कौतुक केले, ज्यांनी चिरंतन वारसा मागे सोडला आहे असे ते म्हणाले.
अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सुलिव्हन यांनी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांचे पत्र सुपूर्द केले, त्याबद्दल पंतप्रधानांनी मनापासून कौतुक केले.
उभय देशांमधील लोकांच्या भल्यासाठी आणि जागतिक हितासाठी दोन्ही लोकशाही देशांमधील घनिष्ठ सहकार्य अधिक वृध्दिंगत करण्याच्या आपल्या वचनबद्धतेची पंतप्रधानांनी पुष्टी केली.
पंतप्रधानांनी राष्ट्राध्यक्ष बायडेन आणि अमेरिकेच्या प्रथम महिला डॉ.जिल बायडेन यांना शुभेच्छा दिल्या.
S.Kane/S.Bedekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
It was a pleasure to meet the US National Security Advisor @JakeSullivan46. The India-US Comprehensive Global Strategic Partnership has scaled new heights, including in the areas of technology, defence, space, biotechnology and Artificial Intelligence. Look forward to building… pic.twitter.com/GcU5MtW4CV
— Narendra Modi (@narendramodi) January 6, 2025