Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

अमेरिकेच्या भारतीय धोरणात्मक भागीदारी मंचच्या मंडळ सदस्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट


अमेरिकेचे मोठे उद्योगपती आणि व्यावसायिकांचा समावेश असलेल्या अमेरिकेच्या भारतीय धोरणात्मक भागीदारी मंचच्या मंडळ सदस्यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

दिवसाच्या सुरवातीला भारतीय नेतृत्व परिषदेत झालेल्या, घडामोडींची व्यापक कल्पना त्यांनी पंतप्रधानांना दिली. मागील चार वर्षात सरकारने आर्थिक आणि नियामक सुधारणांच्या अंमलबजावणीची त्यांनी प्रशंसा केली आणि भविष्यात हे बंध अधिक दृढ व्हावेत अशी ईच्छा व्यक्त केली ज्यामुळे वेगाने वाढत्या भारतीय अर्थव्यवस्थेमुळे दोन्ही देशांना लाभदायी संधींची निर्मिती होऊ शकेल.

पंतप्रधानांनी सांगितले की, दोन्ही देशांना आर्थिक गुंतवणूकीद्वारे अभूतपूर्व पद्धतीने लाभ झाला आहे. त्यांनी अमेरिकन कंपन्यांना नवीन क्षेत्रातील व्यवसाय संधी, जसे की स्टार्ट-अप, ऊर्जा, आरोग्य सेवा आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा पूर्ण लाभ घेण्यासाठी प्रोत्साहन दिले.

******

PIBMUM/ B. Gokhale