Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा पंतप्रधानांना दूरध्वनी; दिवाळी शुभेच्छांचे आदान-प्रदान


अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी नव्याने सुरु झालेल्या हॉटलाईनवर संपर्क साधला. दोन्ही नेत्यांनी परस्परांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. “काही वेळापूर्वीच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी दूरध्वनी केला आम्ही दिवाळीच्या शुभेच्छांचे आदान-प्रदान केले. नव्याने सुरु झालेल्या हॉटलाईनवर हे आमचे पहिलेच संभाषण होते.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ओबामा आणि मी बऱ्याच अन्य मुद्दयांवरही चर्चा केली. व्हाईट हाऊस कशाप्रकारे दिवाळी साजरी करत आहे हे जाणून आनंद वाटला.
मला आणि राष्ट्रपती ओबामा यांना तुर्कीमध्ये जी-20 संमेलनात होणाऱ्या भेटीची प्रतिक्षा आहे”, असे ट्विट पंतप्रधानांनी केले आहे.

S.Patil/N.Sapre