Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

अमृत महोत्सव कार्यक्रमला साबरमती आश्रमातून प्रारंभ होणार : पंतप्रधान


पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अहमदाबाद मधल्या साबरमती आश्रमातून पदयात्रेला  ( स्वातंत्र्य यात्रा ) प्रारंभ करणार आहेत.

दांडी यात्रा जिथून सुरु झाली होती त्या साबरमती आश्रमातून आजच्या   अमृत महोत्सव कार्यक्रमाचा प्रारंभ होईल  असे पंतप्रधानांनी ट्वीटर वर म्हटले आहे. भारतीयांमध्ये अभिमान आणि आत्मनिर्भरतेची भावना दृढ करण्यात या यात्रेची महत्वाची भूमिका राहिली. ‘व्होकल फॉर लोकल’ ही बापू आणि आपल्या महान स्वातंत्र्य सैनिकांना अनोखी आदरांजली आहे, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

कोणतेही स्थानिक उत्पादन खरेदी करून ‘व्होकल फॉर लोकल’ या हॅशटॅगचा  वापर करून छायाचित्र सोशल मिडियावर पोस्ट करा. साबरमती आश्रमाजवळ मगन निवास इथे चरखा बसवण्यात येणार आहे. आत्मनिर्भरतेशी संबंधित प्रत्येक ट्वीट केल्यानंतर हा चरखा फिरून वर्तुळ पूर्ण करेल.लोक चळवळीला यामुळे बळ प्राप्त होईल असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

***

JPS/NC/CY

 ***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com