अमली पदार्थ आणि मानसिक स्वास्थ्य बिघडवणाऱ्या औषधांच्या नियंत्रणातील सहकार्यासाठी भारत आणि थायलंड यांच्यात सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने अमली पदार्थ आणि मानसिक स्वास्थ्य बिघडवणाऱ्या औषधांच्या नियंत्रणातील सहकार्यासाठी भारत आणि थायलंड यांच्यात सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी दिली.
वरील क्षेत्रातील सर्व समस्यांचा सामना करण्यासाठी आवश्यक परस्पर सहकार्य आणि मदत पुरवणारा हा करार एक परिणामकारक यंत्रणा आहे. यामुळे उभय देशांदरम्यान संस्थात्मक संवाद वाढण्यास मदत होईल. तसेच तो लागू झाल्यावर अमली पदार्थ तस्करीला आळा बसेल.
B.Gokhale/S.Kane/Anagha