Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

अमरेली येथील सहकार संमेलनाला पंतप्रधानांचे संबोधन


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अमरेली येथील नव्याने बांधण्यात आलेल्या एपीएमसी मार्केट यार्डचे उद्‌घाटन केले. त्यांनी अमर डेअरीच्या नवीन प्रकल्पाचे उद्‌घाटन तसेच मध प्रकल्पाचे भूमिपूजनही केले.

सहकार संमेलनाला संबोधित करतांना पंतप्रधान म्हणाले की, “मला सहकार जगतात तरुण नेतृत्व कार्यरत असल्याचे बघून आनंद होत आहे. मला आठवत आहे की, जेव्हा मी मुख्यमंत्री होतो, त्या काळात सौराष्ट्रात डेअरी प्रकल्प कसे वृद्धिंगत झाले.”
ते पुढे म्हणाले की, ई-नाम योजना ही शेतकऱ्यांसाठी लाभकारी असून, चांगली बाजारपेठ मिळवण्यासाठी उपयुक्त आहे. नीलक्रांती आणि मधुरक्रांती यामुळे सौराष्ट्रातील लोकांच्या जीवनात संभाव्य परिवर्तन घडून येईल, असेही त्यांनी सांगितले.

पंतप्रधान म्हणाले की, केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या गरजा पूर्ण करण्याबाबत संवेदनशील आहे.

B.Gokhale/D.Rane