Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

“अबंडन्स इन मिलेट्स” या गाण्यामुळे अन्न सुरक्षा देण्याच्या आणि उपासमार दूर करण्याच्या महत्त्वपूर्ण ध्येयाला  सर्जनशीलतेची जोड मिळाली आहे: पंतप्रधान


 

श्री अन्न किंवा भरड धान्यात विपुल प्रमाणात पौष्टिकता असल्यामुळे त्याचा वापर केल्याने आरोग्य चांगले राहते आणि शरीर तंदुरुस्त राहते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

पंतप्रधानांच्या पुढाकाराने संयुक्त राष्ट्रांनी 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष म्हणून घोषित केल्याने प्रेरित होऊन ग्रॅमी पुरस्कार विजेती भारतीय-अमेरिकन गायिका फालू हिने “अबंडन्स इन मिलेट्स” हे गाणे तयार आणि सादर केले आहे. भरडधान्याला प्रोत्साहन देण्यासाठी, शेतकर्‍यांना या पिकांचे उत्पादन घेता यावे यासाठी आणि जगातील उपासमार संपवण्यात मदत करण्यासाठी पंतप्रधानांसोबत सहभागी होत  आपण एक गाणे लिहिल्याचे  तिने एका ट्विट संदेशात म्हटले आहे.

त्या संदेशाला पंतप्रधानांनी ट्विटदवारे उत्तर दिले आहे:

उत्कृष्ट प्रयत्न @FaluMusic! श्री अन्न किंवा भरडधान्य खूप पौष्टिक आणि आरोग्यदायी आहे. अन्न सुरक्षा देण्याच्या आणि उपासमारी दूर करण्याच्या महत्त्वाच्या ध्येयाला या गाण्यातून सर्जनशीलतेची जोड मिळाली आहे.”

***

S.Kakade/P.Jambhekar/P.Kor

 

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai