Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

अफगाणिस्तानातल्या सलमा धरण प्रकल्पाच्या सुधारित खर्च अंदाजाला मंत्रिमंडळाची मंजुरी


केंद्रीय मंत्रिमंडळाने अफगाणिस्तानातल्या हेरत प्रांतातील सलमा धरण प्रकल्पाच्या पुनर्बांधणीच्या 1775.69 कोटी रुपये सुधारित खर्चाच्या अंदाजाला मंजुरी दिली.

भारतीय रुपया आणि अमेरिकन डॉलरचा बदलता विनिमय दर, प्रकल्प पूर्ण होण्याचा कालावधी वाढल्यामुळे सल्लामसलत शुल्कात झालेली वाढ, प्रसार, अफगाणी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आदी बाबींमुळे प्रकल्पखर्चात सुधारणा करणे आवश्यक होते.

जून 2016 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित आहे. जलसंपदा मंत्रालयाच्या अखत्यारीतील मे. वापकॉस ही सार्वजनिक कंपनी हा प्रकल्प राबवत आहे.

हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर ऊर्जा आणि सिंचनाची गरज भागेल आणि पश्चिम अफगाणिस्तानचा सर्वांगीण आर्थिक विकास होईल आणि अफगाणिस्तानमध्ये भारताची प्रतिष्ठा वाढेल.

(Release ID :133813)
S.Kane/S.Tupe/M.Desai