Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

अफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांच्या भारत भेटीरम्यान दोन्ही देशांनी जारी केलेले संयुक्त निवेदन

अफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांच्या भारत भेटीरम्यान दोन्ही देशांनी जारी केलेले संयुक्त निवेदन


इस्लामिक रिपब्लिक ऑफ अफगाणिस्तानचे राष्ट्रपती डॉ मोहम्मद अश्रफ घनी यांच्या 14 आणि 15 सप्टेंबरच्या भारत भेटीदरम्यान त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. त्यांच्या या दौऱ्यादरम्यान त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली, त्यानंतर रात्री ते राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत.

राष्ट्रपती घनी यांच्यासोबत झालेल्या बैठ्कीदरम्यान पंतप्रधान मोदी यांनी डिसेंबर २०१५ मध्ये काबूल तसेच यावर्षी २०१६ मध्ये हेरात इथे घनी यांच्यासोबत झालेल्या भेटीची आठवण केली. या दोन्ही भेटीदरम्यान अफगाणिस्तान सरकारने केलेल्या स्वागत समारंभामुळे आपण भारावून गेलो होते, असे पंतप्रधानांनी आपल्या आठवणी जाग्या करताना सांगितले. तसेच तेहरान (मे २०१६) आणि ताश्कंद (जून २०१६) झालेल्या भेटीत अतिशय सकारात्मक आणि फलदायी चर्चा झाल्याचेही पंतप्रधानांनी यावेळी नमूद केले.

भारत आणि अफागानिस्तानाच्या दरम्यान नियमित होत असलेल्या चर्चांमुळे उभय देशांचे संबंध अधिकाधिक दृढ होत असल्याविषयी दोन्ही नेत्यांनी आनंद व्यक्त केला. दोन्ही देशांमधील राजनैतिक भागीदारी आणि सर्वांगीण सहकार्य वाढवण्यासाठी या चर्चा उपयुक्त ठरतील. असे मत उभय नेत्यांनी व्यक्त केले.

अफगाणिस्तानमध्ये राजकीय,आर्थिक आणि सुरक्षाविषयक स्थित्यंतरे सुरु असताना भारत-अफगाणिस्तान द्विपक्षीय विकास सहकार्य अफगाण सरकारसाठी अतिशय महत्वाचे ठरले, हे अधोरेखित करत उभय नेत्यांनी, अफगाणिस्तानचे संसद भवन आणि अफगाणिस्तान-भारत मैत्री धरण अशा ऐतिहासिक प्रकल्पांचे लोकार्पण झाल्याबद्दल दोन्ही नेत्यांनी आनंद व्यक्त केला. २२ ऑगस्ट २०१६ ला विडीओ लिंकच्या माध्यमातून स्टोर पॅलेसचे संयुक्त उद्‌घाटन झाले त्यावेळी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सव्वाशे कोटी भारतीय अफगाणिस्तानच्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्याचे आश्वासन दिले होते, त्याचे विशेष महत्व असल्याचे घनी यावेळी म्हणाले.

अफगाणिस्तानच्या एकात्मिक, सार्वभौम, लोकशाही, शांततामय, स्थिर आणि समृद्ध देशाला भारताचा सदैव पाठींबा राहील, याचा पंतप्रधानानी यावेळी पुनरुच्चार केला. शिक्षण, आरोग्य, कृषी, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरण, उर्जा, पायाभूत सुविधा आणि लोकशाही संस्थांचे बळकटीकरण अशा विविध क्षेत्रात अफगाणिस्तानची क्षमता वाढवणे आणि इतर सर्व प्रकारच्या सहकार्यासाठी भारत सदैव तयार असल्याची ग्वाही यावेळी पंतप्रधानांनी दिली.तसेच, एक जवळचा शेजारी आणि मित्रदेश म्हणून अफगानिस्तान व तिथल्या नागरिकांच्या कल्याणासाठी भारत एक अब्ज अमेरिकन डॉलर्सची मदत देत असल्याची घोषणा यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. भारताकडून जागतिक दर्जाच्या औषधांचा माफक दरात पुरवठा करण्याचे आश्वासन तसेच परस्पर सहकार्यातून सौर उर्जा उत्पादन करण्याचा प्रस्तावही यावेळी पंतप्रधांनानी मांडला.

दोन्ही राष्ट्रप्रमुखानी या बैठकीत प्रादेशिक स्थितीविषयी चर्चा केली आणि राजकीय लाभांसाठी दहशतवाद आणि हिंसेचा वापर करण्याच्या प्रवृत्तीविषयी यावेळी चिंता व्यक्त करण्यात आली. या प्रवृत्तीमुळे आशियाई प्रदेशात शांतता, स्थैर्य आणि प्रगतीला धोका निर्माण झाला असल्याचे दोन्ही देशांनी एकमताने मान्य केले. कुठलाही भेदभाव न करता सर्व प्रकारच्या दहशतवादाचे समूळ उच्चाटन करणे अतिशय गरजेचे असल्याविषयी उभय नेत्यांनी एकवाक्यता व्यक्त केली. दहशतवादी तळांना आपली भूमी वापरू देणे, अशा कारवायांना कुठल्याही प्रकारे प्रोत्साहन देणे, पाठींबा, मदत करणे, जे दहशतवादी भारत आणि अफगानिस्तानवर हल्ला करतात त्याना छुपी मदत करणे अशा सर्व कारवाया बंद केल्या जाव्यात असे आवाहन दोन्ही नेत्यांनी केले.दोन्ही नेत्यांनी दहशतवादा विरोधातली लढाई सुरूच ठेवणे आणि सुरक्षा व संरक्षण सहकार्य वाढवण्यावर भर दिला. यासाठी भारत- अफगाणिस्तान दरम्यान राजनैतिक भागीदारी करार करण्याविषयी उभय देशांनी तयारी दर्शवली.

भारत आणि अफगाणिस्तानच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेली राजनैतिक भागीदारी परिषदेची लवकरच बैठक होईल, असे यावेळी ठरवण्यात आले. या बैठकीत सहकार्याची विविध क्षेत्रे आणि परस्पर मार्गदर्शनाविषयी चार संयुक्त कृतिगटानी केलेल्या शिफारसींचा आढावा घेतला जाईल

दोन्ही देशांमध्ये झालेल्या नागरी आणि व्यावसायिक क्षेत्रातल्या मुद्द्यांशी संबंधित करारारावर , राष्ट्रपतींच्या दौऱ्यादरम्यान उभय देशांच्या भूमीचा शांततामय कार्यांसाठी वापर करणे तसेच प्रत्यर्पण कराराविषयी उभय राष्ट्रप्रमुखांनी समाधान व्यक्त केले. चाबाहर बंदराच्या वापराविषयी भारत, अफगाणिस्तान आणि इराण दरम्यान झालेल्या कराराची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यावर यावेळी भर देण्यात आला. या संदर्भात, तीनही देशांनी नुकताच सर्व हितसंबंधी गटांच्या प्रतिनिधीना घेऊन एक संयुक्त मंच स्थापन करण्याचा निर्णय नुकताच तिन्ही राष्ट्रांनी घेतला आहे.

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यासह इतर आशियाई देशांशी चर्चा करून त्यांच्या सहकार्याने अफगाणिस्तान मध्ये शांतता, स्थैर्य आणून विकास करण्यासाठीचे प्रयत्न अधिक गतिमान करायला उभयपक्षी सहमती दर्शवण्यात आली. भारत-इराण-अफगाणिस्तान मधील त्रिपक्षीय चर्चा फलदायी ठरल्याविषयी आनंद व्यक्त करतानाच या महिन्यात भारत-अमेरिका- अफगाणिस्तान यांच्यात न्यूयॉर्क यरयेथे होणारी चर्चाही सकारात्मक होईल अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. आंतरराष्ट्रीय समुदायाच्या सोबत अफगाणिस्तानच्या राष्ट्रबांधणीसाठी सहकार्य करायला भारत यापुढेही तत्पर असेल, अशी ग्वाही पंतप्रधानांनी यावेळी दिली.

याचसंदर्भात येत्या ४ डिसेंबरला होणाऱ्या अमृतसर मंत्रीस्तरीय परिषदेत एशिया-इस्तंबूल प्रक्रिया आणि ५ ऑक्टोबरला होणारी ब्रसेल्स परिषद अतिशय महत्वाची असल्याचे दोन्ही नेत्यांनी अधोरेखित केले.या परिषदेसाठी अमृतसराची निवड होणे हे ही विशेष महत्वाचे असल्याचे या बैठकीत सांगण्यात आले. दक्षिण आशिया आणि मध्य आशिया दरम्यान दुहेरी संपर्क यंत्रणा जलदगतीने पूर्ण करण्यास दोन्ही देशांनी यावेळी कटिबद्धता दर्शवली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी राष्ट्रपती घनी याना अमृतसर मंत्रीस्तरीय परिषदेचे उद्‌घाटन करण्यासाठी आमंत्रित केले. राष्ट्रपतींनी त्या आमंत्रणाचा स्वीकार केला. राष्ट्रपती या दौऱ्यात भारतातील मोठे उद्योजक आणि उद्योगपतीशी चर्चा करतील. अफगाणिस्तानातील व्यापार संधी आणि क्षमता याविषयी घनी त्याना माहिती देतील. त्याशिवाय, संरक्षण अभ्यास आणि विश्लेषण संस्थेतर्फे निवडक तज्ञ मंडळींसाठी आयोजित “राजकीय हिंसा आणि जागतिक दहशतवादाची पाचवी लाट’ या विषयावर त्त्यांचे भाषणही होणार आहे

B.Gokhale/R.Aghor/Anagha