पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान अपंगत्वक्षेत्रातील सहकार्यासाठी सामंजस्य करारावरील स्वाक्षऱ्यांना मंजुरी दिली. या स्वाक्षऱ्या दिनांक 22 नोव्हेंबर 2018 रोजी ऑस्ट्रेलियाच्या सिडनी येथे करण्यात आल्या होत्या.
फायदेः
भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान विकलांग क्षेत्रात संयुक्त उपक्रमांद्वारे, सहकार्य करण्या बाबतच्या झालेल्या सामंजस्य करारामुळे या क्षेत्राला प्रोत्साहन मिळेल आणि यामुळे द्विपक्षीय संबंध मजबूत होतील. या सामंजस्य करारामुळे विकलांग व्यक्तींचे पुनर्वसन सुधारण्यासाठी (विशेषतः बौद्धिक विकलांगता) आणि दोन्ही देशांतील मानसिक आजार असलेल्या व्यक्तींसाठीअनेक सुविधा देण्यात येतील. अंमलबजावणीसाठी दोन्ही देश परस्पर सहमती म्हणून अपंगत्व क्षेत्रात विशिष्ट प्रस्ताव मांडतील.
******
B. Gokhale