Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

अन्न सुरक्षा क्षेत्रातील सहकार्याबाबत भारत आणि भूतान यांच्यातील करारावर स्वाक्षरी करण्यास मंत्रिमंडळाची मान्यता


नवी दिल्‍ली, 13 मार्च 2024

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने  आज अन्न सुरक्षेच्या क्षेत्रातील सहकार्याबाबत भूतान रॉयल सरकारच्या आरोग्य विभागा अंतर्गत असलेल्या  अन्न आणि औषध प्राधिकरण (बीएफडीए) आणि भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (एफएसएसएआय) यांच्यातील करारावर स्वाक्षरी करण्यास मान्यता दिली.

भूतान रॉयल सरकारच्या आरोग्य विभागा अंतर्गत असलेल्या  अन्न आणि औषध प्राधिकरण (बीएफडीए) आणि भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालया अंतर्गत असलेल्या भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (एफएसएसएआय) यांच्यातील करार दोन शेजारी देशांमधील व्यापार सुलभ करेल.  या करारा अंतर्गत भारतात उत्पादने निर्यात करताना,एफएसएसएआयने विहित केलेल्या आवश्यकतांचे पालन केल्याचा पुरावा म्हणून बीएफडीए आरोग्य प्रमाणपत्र जारी करेल. यामुळे व्यवसाय  सुलभतेला चालना मिळेल आणि दोन्ही बाजूंनी अनुपालन खर्च कमी होईल.

 

* * *

S.Patil/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai